बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ?
बीड : हत्याप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अजित पवारांनी मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी थेट मागणी होतेय. यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना पुरावा नसल्याने कारवाई नाही असा पवित्रा घेतला आहे.
अजित पवार यांचे मत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, या प्रकरणात सीआयडी, एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही.
सरकारनं संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे.
नैतिकतेच्या आधारावर दिलेले राजीनामे
अजित पवार यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्याच्या राजकारणात नैतिकतेच्या आधारावर आजवर अनेक नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्याच्या इतिहासातील नैतिकतेच्या आधारावर दिलेले राजीनामे पुढीलप्रमाणे:
बॅ. अब्दुल रहेमान अंतुले (मुख्यमंत्री): सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. बॅ. रामराव आदिक (उपमुख्यमंत्री): एअर होस्टेसची छेडखानी केल्याचा आरोप झाल्यावर राजीनामा दिला. शिवाजीराव पाटील-निलंगेकर (मुख्यमंत्री): मुलीचे गुण परिक्षेत वाढवल्याचा आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. मनोहर जोशी (मुख्यमंत्री): जावयाच्या बांधकाम प्रकरणामुळे राजीनामा दिला. अशोकराव चव्हाण (मुख्यमंत्री): ‘आदर्श’ प्रकरणी आरोप झाल्यावर राजीनामा दिला. विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील: 26/11 च्या हल्ल्यानंतर राजीनामा दिला. छगन भुजबळ: तेलगी प्रकरणी आरोप झाल्यावर राजीनामा दिला. बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन: आरोप झाल्यावर राजीनामे दिले. अजित पवार (उपमुख्यमंत्री): सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला.
क्लिक करा. - जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सध्याच्या परिस्थितीत काय घडत आहे? नैतिकतेच्या आधारावर राजीनामे देणे हा त्या मंत्र्यांचा वा नेत्यांचा स्वतःचा अधिकार आहे. ज्याने-त्याने सद्सद्विवेक बुद्धिच्या आधारावर हा निर्णय घ्यायचा असतो.
अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी आपण राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोपांवरील चर्चा काय ? आरोप झाल्यावर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. राज्यातील अनेक मंत्र्यांनी गुन्हा सिद्ध होण्याची वाट पाहिली नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र
आताची सर्वांत मोठी बातमी : 'बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलणार' पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट