26 आयफोन शरीराला चिकटवले...! 20 वर्षीय तरुणीचा बसमध्ये गुदमरून मृत्यू
ब्राझील: ब्राझीलमधील एका 20 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. बसमध्ये झालेल्या मृत्यूच्या तपासात तिच्या शरीरावर टेपने चिकटवलेले तब्बल 26 आयफोन सापडले, ज्यामुळे तस्करीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना फोज दो इगुआकू शहर आणि साओ पाउलो यामधील प्रवासादरम्यान 29 जुलै रोजी घडली. ही मुलगी बसने एकटीच प्रवास करत होती. प्रवाशांनी सांगितले की, वाटेत तिची तब्येत बिघडू लागली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता.
तरुणीचा बसमध्येचं मृत्यू -
ग्वारापुआवा शहराजवळील एका बस थांब्यावर, तरुणी अचानक बेशुद्ध पडली. घटनास्थळी तत्काळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा पोहोचली. जवळपास 45 मिनिटे CPR व इतर प्रयत्न करूनही मुलीला वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले. तथापी, डॉक्टरांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी ती हालचाल करत होती, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय आहे.
हेही वाचा - छत्तीसगडमध्ये दुचाकीला बांधून अजगराला क्रूरपणे ओढले; व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त
तरुणीच्या शरीरावर चिटकवले होते 26 आयफोन -
वैद्यकीय पथकाने मुलीवर प्राथमिक उपचार करताना तिच्या शरीरावर अनेक अडथळे जाणवले. तपासणी करताना लक्षात आले की, तिच्या शरीरावर टेपने चिकटवलेले 26 आयफोन लपवण्यात आले होते. हे सर्व फोन अत्यंत घट्टरीत्या बांधलेले होते, ज्यामुळे तिचा श्वास घुटमळला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - सौदी अरेबियामध्ये हवेतून ‘360 अंश’ राईडचा झोपाळा थेट जमिनीवर कोसळला; 23 जण गंभीर जखमी
तरुणीच्या सामानात आढळल्या दारूच्या बाटल्या -
याशिवाय, मुलीच्या सामानातून दारूच्या अनेक बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी तस्करीचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. सध्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतर तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जप्त केलेले सर्व आयफोन ब्राझीलच्या फेडरल रेव्हेन्यू सर्व्हिसकडे सोपवण्यात आले आहेत. पोलिस या प्रकरणाचा व्यापक तपास करत आहेत. तथापी, पोलिसांनी ही घटना तस्करी रॅकेटची शक्यता असल्याचे सांगितले आहे.