पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याती

पुण्यातील 55 वर्षीय उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांचा पाटणा, बिहार येथे सायबर फसवणूक करून खून करण्यात आला आहे. कंपनीच्या कामासाठी मेल करून त्यांना पाटण्यात बोलावलं आणि उद्योगपतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी बिहारच्या विशेष संघाने पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे (वय: 55) हे कोथरूड परिसरातील एक उद्योगपती आहेत. 'स्वस्त दरात टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो', असा ई-मेल आरोपींकडून करण्यात आला होता. या ई-मेलद्वारे लक्ष्मण साधू शिंदे यांना पाटण्यात बोलावण्यात आले होते.

पाटण्यात पोहोचताच अपहरण

कामानिमित्त, उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे पाटण्यात पोहोचताच त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांना एका शेतात नेलं आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करू लागले. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांची हत्या केली. या प्रकरणात तीन ते चार आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, ही घटना सायबर गुन्ह्यांतील अतिशय गंभीर बाब ठरली आहे.

घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी नोंदवली पोलिसांत तक्रार

उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे अजूनही घरी आले नाही म्हणून शिंदे कुटुंबीयांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लक्ष्मण साधू शिंदे बेपत्ता आहेत अशी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपींची शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी पाटण्यात उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. आरोपींची माहिती मिळताच, बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने पाच संशयितांना जेहानबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून ताब्यात घेतले. सध्या, बिहार पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पुणे पोलिस उद्योगपती शिंदे यांचा मृतदेह परत आणण्यासाठी बिहारमध्ये पोहोचले आहेत. उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांचा 'सायबर मर्डर' झाल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.