बीड जिल्ह्यातील एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली

बीडमधील तरुणाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून संपवले जीवन; पुण्यात केली आत्महत्या

पुणे : बीड जिल्ह्यातील एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. हा तरुण भोपाळमधील एआयआयएमएस (AIIMS) येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. 

बीडमधील 20 वर्षीय तरुणाने स्वत:चे जीवन संपवले. पुण्यात आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते. उत्कर्ष महादेव शिंगणे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कंट्रोल रूमला कॉल जाताच अधिकाऱ्यांकडून परिसराची झडती घेण्यात आली. मुलांच्या वसतिगृहाच्या (बॉईज हॉस्टेल) बाथरूमध्ये मृतदेह सापडला. 

हेही वाचा : मेट्रो 3; पहिल्या दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलांच्या वसतिगृहात नेमकं काय झालं? बीडमधील तरुणाने पुण्यात आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून त्याने आयुष्याचा शेवट केला. उत्कर्ष शिंगणे असे या वीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. उत्कर्ष भोपाळ एआयआयएमएस (AIIMS)  येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. आत्महत्यापूर्वी उत्कर्षने सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं होतं. यानंतर त्याच्या घरच्यांनी कंट्रोल रुमला कॉल केला आणि सदर मुलगा आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे. आत्महत्येसंदर्भात एक सुसाईड नोट त्याने व्हॉट्सअपद्वारे  पाठवली असल्याचे उत्कर्षच्या कुटुंबियांनी सांगितले. या संदर्भात सशस्त्र दल वैद्यकीय सेवा  (Armed Forces Medical College) येथील अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर चेक केल्यानंतर मुलांच्या वसतिगृहातील  बाथरूममध्ये कमोडवर बसलेल्या अवस्थेत उत्कर्ष सापडला. तसेच खाली रक्त पडलेले होते आणि शेजारीच चाकूही पडलेला होता. उत्कर्षचे साहित्यही बाथरूममध्ये पाठीमागे ठेवलेले दिसले. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांकडून चेक केले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.