शुभदा कोदारे हत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन
पुणे : सध्या राज्यात पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरण गाजते आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील 10 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आरोपी कृष्णा कनोजाला 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पुण्यातील आयटी कंपनीमध्ये महिलेच्या खुन प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फायंडिंग कमिटी (घटनेची तथ्य शोध घेणारी समिती) संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. केरळ आणि हरयाणा या राज्याच्या माजी पोलीस महासंचालक तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सेक्रेटरी या समितीमध्ये असणार आहेत.पुढील 10 दिवसात समितीकडून आयोगाला अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळच्या माजी पोलीस महासंचालक आर. श्रीलेखा, हरयाणाच्या माजी पोलीस महासंचालक डॉ. बी.के. सिन्हा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सेक्रेटरी मीनाक्षी नेगी यांचा समितीत सहभाग आहे.
हेही वाचा : Torres Scam : आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार ; पुढे काय होणार?
पुण्यातील येरवडा कंपनीमध्ये काम करत असलेल्या शुभदा कोदारे या महिलेचा खून करण्यात आला होता. आर्थिक वादातून तिच्या सहकाऱ्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये खून केल्याने एकच खळबळ उडाली होती.या प्रकरणी आरोपी कृष्णा कनोजा याला 13 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.