Mahadev Munde Case: 'माझा एन्काउंटर करा, पण न्याय द्या'; ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Mahadev Munde Case: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी अजूनही आरोपी न पकडल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा संयमाचा बांध अखेर तुटला आहे. न्याय मिळवण्यासाठी महिनाभर धडपड केल्यानंतर, आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घालत आक्रोश व्यक्त केला आहे. ‘गुन्हा दाखल करायचा असेल तर माझा एन्काउंटर करा… पण माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना अटक करा!’ असा संतप्त इशारा त्यांनी दिला.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उलट त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांचा संताप आणखी उफाळून आला. त्या म्हणाल्या, ‘मी महिनाभर वाट पाहीन, पण जर न्याय मिळाला नाही तर एसपी ऑफिससमोर आत्मदहन करणारच…’
महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर तब्बल काही महिने उलटले तरी आरोपींना अटक न झाल्याने कुटुंब आणि स्थानिकांमध्ये संतापाचा सूर आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हेही वाचा: महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात?
महादेव मुंडे हत्याकांडाचा घटनाक्रम:
-20 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी महादेव मुंडे यांनी मुलांना ट्युशनवरून घरी सोडले आणि पिग्मी कलेक्शनसाठी बाहेर पडले.
-सायंकाळी 7:10 वाजता ते शेवटचे शिवाजी चौकात सीसीटीव्हीत दिसले.
-त्यानंतर आझाद चौकात मित्राला भेटले.-रात्री 9 वाजता त्यांची मोटरसायकल वनविभाग कार्यालयासमोर सापडली; गाडीवर रक्ताचे डाग, कागदपत्रे, दोन चपला; यातील एक त्यांची होती. हेही वाचा: महादेव मुंडे हत्या प्रकरण: पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच घेतलं विष -दुसऱ्या दिवशी सकाळी अवघ्या 50 मीटरवर मृतदेह सापडला; गळा कापलेला, शरीरावर वारांचे खुणा, मोबाईल, अंगठी, लॉकेट आणि रोकड गायब.
-पोलिसांनी आठ दिवसांत आरोपी पकडण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर अंत्यसंस्कार झाले.
-आजही या हत्येचं गूढ कायम आहे; हा लुटमारीचा प्रकार की पूर्वनियोजित कट?
ज्ञानेश्वरी मुंडे यांचा संघर्ष हा न्यायासाठीचा आहे, पण त्यांच्या संघर्षाकडे सरकार आणि प्रशासन लक्ष देणार का, हा मोठा प्रश्न आज उपस्थित झाला आहे.