डॉ. अजय तावरे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आह

किडनी रॅकेट प्रकरणी डॉ. अजय तावरेला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे : डॉ. अजय तावरे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. किडनी रॅकेटमध्ये अजय तावरेला सहआरोपी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. डॉ. अजय तावरे ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक आहेत. तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण? तावरे याची किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका आहे. तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत. हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. डॉ. तावरे हा तेव्हा रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्याने बनावट कागदपत्रांना मान्यता दिली असल्याचे नमूद करण्यात आले होते. 

हेही वाचा : लग्न मोडण्याची धमकी देत शशांकने...;वैष्णवीच्या वडिलांनी हगवणेंचा वकिलांचे दावे काढले खोडून

कोण आहे डॉक्टर अजय तावरे? 2022 मध्ये अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्यपदी अजय तावरे याची नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूरच्या महिलेच्या किडनी तस्करीमुळे खळबळ उडाली आहे. आरोपानंतर तावरेची ससूनच्या अधीक्षक पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. 2023 मध्ये आमदार सुनील टिंगरेंच्या शिफारशीनंतर पुन्हा अधीक्षकपदी निवड झाली. आयसीयूतील रुग्णाला उंदीर चावल्यानं त्यानंतर पुन्हा हकालपट्टी तावरेची हकालपट्टी करण्यात आली. नंतर फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती झाली. पोर्शे अपघातप्रकरणी सुट्टीवर असतानाही रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर अजय तावरेची कारागृहात रवानगी झाली.