मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून एका व्

Nashik Crime News: मद्यपान करण्यास पैसे न दिल्याने स्वत:चे घर पेटविले

किरण गोटूर. प्रतिनिधी. नाशिक: नाशिक शहरातील भगवती चौकातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून एका व्यक्तीने स्वतःचे राहते घर पेटवले. या घटनेबाबत पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू बेचिराख झाले आहे. 

हेही वाचा: Mahadevi Elephant Kolhapur: सरकार संपूर्ण ताकद लावणार, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरसावले

नेमकं प्रकरण काय?

संतोष काळे त्यांच्या कुटुंबीयांसह दुमजली घरात राहतात. तसेच, तळमजल्यावर संशयित सुरेश पामदास काळे एकटे राहत होते. सोमवारी दुपारी सुरेश काळे यांनी वरच्या मजल्यावर जाऊन संतोष काळे यांच्याकडे मद्यपान करण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पैसे देण्यास नकार संतोष यांनी नकार दिला. त्यामुळे, सुरेश यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेत खाली उतरून घरासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीतून पेट्रोल काढले. त्यानंतर, त्यांनी ते पेट्रोल घराच्या तळमजल्यावर नेले आणि आग लावली. या दरम्यान, त्यांनी घराला कुलूप लावले आणि फरार झाले. घरातून धूर बाहेर येतानाचा दृष्य पाहून नागरिकांनी तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलांना माहिती दिली. 

हेही वाचा: कोर्टाच्या इमारतीत संशयास्पद प्रकार, खिळा ठोकलेला लिंबू आढळला; जादूटोण्याची शक्यता

घटनेची माहिती मिळताच, सिडको अग्निशमन केंद्राचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या दरम्यान, घरातील संसारपयोगी वस्तू या आगीत बेचिराख झाले. या घटनेबाबत, पीडित संतोष काळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच, पोलिसांनी तात्काळ चौकशी करून संशयित सुरेश काळे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.