वाल्मिक कराडने मोठ्या प्रमाणावर कुटुंबियांच्या आणि

कराडच्या पिंपरी चिंचवडमधील फ्लॅटचा लिलाव होणार

मुंबई : वाल्मिक कराडने मोठ्या प्रमाणावर कुटुंबियांच्या आणि इतरांच्या नावाने त्याने संपत्ती जमवल्याचा आरोप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पुणे शहरातही वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केल्याचा आरोप होत आहे. त्याच्या संपत्तीपैकी पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला आहे. कराडने मिळकत कर थकवल्याचा त्यांच्यावर आरोप असून नोटीस पाठवूनही त्याने कर भरला नसल्याने या फ्लॅटचा लिलाव केला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.  

बीड हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. पुण्यात झालेल्या आक्रोश मोर्चात धस यांनी कराडच्या मालमत्तेचा पाढा वाचला. वाल्मिकने त्याच्या नावासह पत्नीच्या वाहनचालकाच्या नावावरही मालमत्ता जमवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.

हेही वाचा : उपमुख्यमंत्र्यांकडून आनंदवन महारोगी संस्थेला निधी वितरित  

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडचा पाय दिवसेदिवस खोलात चाललाय. विरोधकांनी आता वाल्मिकच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी त्याच्यावर ईडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : मोदींच्या हस्ते युद्धनौका आणि पाणबुडीचे राष्ट्रार्पण  

बीड प्रकरणी दररोज नवीन खुलासे मिळत आहेत. या हत्येनंतर बीडमधील अर्थकारण समोर आलं असून तेथील राजकीय कार्यपध्दती आणि आर्थिक उलाढाल या गोष्टी धक्कादायक आहे.