मालमत्तेवरून वाद विकोपाला गेला! नातवाने उद्योगपती आजोबावर 73 वेळा चाकूने वार करून केली हत्या
Grandson Stabs Grandfather 73 Times: आंध्र प्रदेशातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. उद्योगपती वेलामती चंद्रशेखर जनार्दन राव यांचा नातू कीर्ती तेजा याने मालमत्तेच्या वादातून आपल्या आजोबावर तब्बल 73 वेळा चाकूने वार करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी कीर्ती तेला याला अटक केली. वेलामती चंद्रशेखर जनार्दन राव हे वेलजन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नातवाने मालमत्तेच्या वादातून जनार्दन राव यांची गुरुवारी रात्री हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या केली. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली, तेव्हा ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा - आईकडून दोन मुलांची गळा दाबून हत्या; नेमकं घडलं काय?
आजोबावर 73 वेळा केला चाकूने वार -
प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेहून परतलेल्या जनार्दन राव यांचा नातू कीर्ती तेजा याने मालमत्तेच्या वादातून आजोबा जनार्दन राव यांची 73 वेळा चाकूने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील एलुरू येथील रहिवासी 86 वर्षीय जनार्दन राव गेल्या काही महिन्यांपासून सोमाजीगुडा येथील त्यांच्या घरी राहत होते. त्यांनी अलिकडेच त्यांच्या मोठ्या मुलीचा मुलगा श्रीकृष्ण याला वेलजन ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. तसेच त्यांची दुसरी मुलगी सरोजिनी देवी हिचा मुलगा कीर्ती तेजा याला 4 कोटी रुपयांचे शेअर्स हस्तांतरित केले होते.
हेही वाचा - जंगलात शिकारीला गेले अन् सहकाऱ्याचीच केली शिकार, रानडुक्कर समजून झाडली गोळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोजिनी देवी आणि कीर्ती तेजा गुरुवारी जनार्दन राव यांच्या घरी गेल्या होत्या. जनार्दन राव आणि कीर्ती तेजा यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद झाला. यावेळी कीर्ती तेजाने त्याचे आजोबा जनार्दन राव यांच्यावर चाकूने हल्ला केला. 29 वर्षीय कीर्ती तेजाने आजोबावर 73 वेळा चाकूने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, चहा घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेलेल्या सरोजिनी देवी आवाज ऐकून परत आल्या. त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा केल्यानंतर, आरोपीने सुरक्षा रक्षकाला धमकावले. तसेच त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी पंजागुट्टा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तथापी, आरोपीला कीर्ती तेजाला अटक करण्यात आली आहे. कीर्ती तेजा नुकताच अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी पूर्ण करून भारतात परतला होता.