मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली असून, ही घट

हृदयद्रावक! पाटण्यात घरात झोपलेल्या 2 मुलांना जिवंत जाळले; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Nurse's children burnt alive in Patna प्रतिकात्मक प्रतिमा

पाटणा: बिहारची राजधानी पाटणा पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरली आहे. जानीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एम्समध्ये कार्यरत असलेल्या नर्स शोभा देवी यांच्या दोन निष्पाप मुलांना काही अज्ञात गुंडांनी जिवंत जाळल्याची अमानुष घटना समोर आली आहे. मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली असून, ही घटना केवळ कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पाटणावासीयांसाठी हादरवून टाकणारी आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

प्राप्त माहितीनुसार, दुपारी मुलं शाळेतून परतल्यावर काही गुंडांनी घरात घुसून त्यांना आत बंद केलं आणि नंतर घराला आग लावली. यामध्ये दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील लोकांना सर्व काही समजण्याच्या आधीच हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून, मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा - Malegaon Blast Final Verdict : 'या' कारणांमुळे मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

पोलिसांकडून तपास सुरू -

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडली असावी किंवा एखाद्या पूर्वनियोजित कटाचा भाग असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अजून कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तथापी, कुटुंबातील सदस्यांचा ठाम आरोप आहे की, हा अपघात नसून पूर्णपणे नियोजित हत्या आहे. शोभा देवी आणि पती लालन कुमार यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'आमच्या निरागस मुलांचा कोणाशी वैर होतं?'

हेही वाचा -  Malegaon Blast Final Verdict: साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता

तेजस्वी यादव यांचा नितीश सरकारवर हल्लाबोल - 

या घटनेनंतर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, 'पाटण्यात गुन्हेगार इतके धाडसी झाले आहेत की आता कुठेही कोणीही सुरक्षित नाही.' या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.