Crime in Extra Marital Affair: अनैतिक संबंधातून घडला भयानक प्रकार, पतीचा खून करायला आले पण बॉयफ्रेंडचा...
मुंबई: अनैतिक प्रेमसंबंधातून एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने अनैतिक प्रेमसंबंधातून आपल्या पतीला ठार मारण्याचा प्लॅन रचल्याचे समोर आले आहे. हा खून करण्यासाठी तिने आपल्या बॉयफ्रेंडसह त्याच्या मित्राचीही मदत घेतली होती. या तिघांनी मिळून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पतीच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. पण महिलेचा बॉयफ्रेंड मृतावस्थेत सापडला आहेय त्यामुळे अनैतिक संबंधातून घडलेला हा प्रकार पाहून पोलीस देखील हादरून गेले आहेत.
नेमकं काय झालं? कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील इंडी डाऊन येथे ही घटना घडली आहे. बीरप्पा पुजारी नावाचा एक व्यक्ती त्याची पत्नी सुनंदा आणि दोन मुलांसह राहतो. 31 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत घरात सगळं सुरळीत सुरु होतं. कुटुंब गुण्या गोविंदाने राहत होतं. मात्र 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरच्या रात्री जे काही घडलं. त्यामुळे बीरप्पाचं आयुष्य बदलून गेलं.
हेही वाचा: Jalgaon Crime : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने संपवले जीवन
31 ऑगस्टच्या रात्री बीरप्पा जेवण करुन आपल्या कुटुंबासह झोपी गेला. रात्री दोनच्या सुमारास दोघे जण घरात शिरले. त्यांनी अचानक बीरप्पाचा गळा दाबायला सुरुवात केली. बीरप्पा झोपत असल्यामुळे त्याला काही समजले नाही. पण जेव्हा त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याची पत्नी मारेकऱ्यांना उकसवत होती. बीरप्पाला जीवंत सोडू नका, त्याला ठार करा, असं ती म्हणत होती.
सगळा प्रकार पाहून बीरप्पाने ताकद लावून हल्लेखोरांच्या तावडीतून स्वत:च्या सुटका केली. यानंतर त्याने आरडाओरड केली. बीरप्पाचा आवाजा ऐकून शेजारी आणि घरमालक बीरप्पाच्या घरी आले. शेजाऱ्यांना पाहताच घरात घुसलेल्या दोघांनी पळ काढला. या हल्ल्यात बीरप्पा जखमी झाला, परंतु त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा भलताच प्रकार उघड झाला. हल्ला करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून सुनंदाचा बॉयफ्रेंड असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुनंदाला अटक केली.
घटनेनंतर दहा दिवसांनी गावाजवळील एका जंगलात सुनंदाचा बॉयफ्रेंड सिद्धप्पा मृतावस्थेत आढळला. त्याने जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सुनंदाला अटक झाल्यानंतर तिने हा सगळा गुन्हा सिद्धप्पा यानेच केल्याचा बनाव रचला. तसेच आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. यामुळे सिद्धप्पा व्यथित झाला. अशा परिस्थितीत पोलिसांनी आपल्याला पकडलं तर आपण कायमच अडकू, अशी भीती सिद्धप्पाला होती. त्यामुळे त्याने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने सुनंदा आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचे सांगतिले. यातूनच हा प्रकार घडला आणि आपण यात अडकू असंही त्याने म्हटले आहे. यानंतर आता सिद्धप्पाने आत्महत्या केली की त्याची हत्या करून त्याला लटकवण्यात आलं. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण अनैतिक संबंधातून घडलेला हा प्रकार पाहून पोलीस चक्रावले आहेत.