दारू पिण्यावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्य

Jalna Crime: 'दारू पिण्यावरून दोस्ताचा दोस्तावर चाकू हल्ला; डोक्यात अडकलेला चाकू घेऊन रुग्णालयात धाव'

Jalna Crime: जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे मैत्री आणि नशा यामधील धूसर सीमारेषा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच आपल्या मित्रावर जीवघेणा हल्ला केला. शौकत शेख असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या डोक्यात थेट चाकू खुपसण्यात आला. ही घटना इतकी गंभीर होती की, डोक्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत शौकतने स्वतःच जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन उपचारासाठी धाव घेतली. ही दृश्यं पाहून रुग्णालयातील कर्मचारीही क्षणभर हादरून गेले.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि शौकत यांच्यात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे वाद झाला. वादाचे रूपांतर क्षणात हिंसक झटापटीत झाले आणि आरोपीने हातात असलेला चाकू शौकतच्या डोक्यात खुपसला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेचं भयावह वास्तव उघड करत आहे. एका क्षुल्लक कारणावरून जीवघेण्या पातळीवर पोहोचणारे संबंध आणि दारूचं विघातक रूप समाजासाठी चिंतेचा विषय बनले आहे.