तिरुअनंतपुरममध्ये राहणाऱ्या अफान नावाच्या 23 वर्षी

Kerala Mass Murder : हातोडीने दणादण घाव; आजी, काका-काकी, भाऊ आणि प्रेयसीसह कुटुंबातील 5 जणांची केली क्रूर हत्या

Kerala Mass Murder : हातोडीने दणादण घाव; आजी, काका-काकी, भाऊ आणि प्रेयसीसह कुटुंबातील 5 जणांची केली क्रूर हत्या

केरळमध्ये घडलेल्या एका भयावह घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तिरुअनंतपुरममध्ये राहणाऱ्या अफान नावाच्या 23 वर्षीय तरुणाने आपल्या जवळच्या सहा नातेवाईकांवर क्रूर हल्ला केला. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आजी, काका-काकी, धाकट्या भावासह प्रेयसीचा समावेश आहे. अफान याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत आपला गुन्हा कबूल केला आहे. अफानच्या कुटुंबाचा आखाती देशांत व्यवसाय होता. पण आर्थिक तंगीमुळे तो डबघाईला आला. तेव्हा त्यांना भारतात परत यावे लागले.   

हातोड्याचे दणादण घाव, घेतला 5 जणांचा बळी

सोमवारी सकाळी 10 वाजता अफान त्याच्या घरातून बाहेर पडला. सर्वप्रथम त्याने 25 किमी अंतरावर राहणाऱ्या आपल्या 70 वर्षीय आजी सलमा बीबीची हत्या केली. त्याने आजी सलमा बीबीची हातोडीने डोक्यावर प्रहार करत तिला जागीच संपवले. त्यानंतर तो तिथून पाच किमी दूर राहणाऱ्या काका लतीफ व काकी सजिदा यांच्या घरी गेला. त्याने हातोडा सोबत ठेवला होता. त्या हातोड्याने त्याने पहिले काका लतीफ यांच्या डोक्यावर जोरदार हल्ला करत फटके मारले. यात लतीफ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने काकी सजिदा हिला देखील हातोड्याने डोक्यावर वार करत संपवले. 

हेही वाचा -  Mahadev Munde Case: नवऱ्याची हत्या; पत्नी उपोषणावर ठाम

 

तिघांची हत्या केल्यानंतर अफान स्वतःच्या घरी पोहोचला. घरी गेल्यानंतर तो धाकट्या भावावर हातोडीने वार केले. यात धाकट्या भावाचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आईच्या डोक्यावर देखील हातोड्याने फटके मारले. रक्तबंबाळ अवस्थेत आईला सोडून तो रूममधून निघाला. आई मेली असं त्याला वाटलं. यानंतर अफानने शेजारी राहणाऱ्या प्रेयसी फरशानाला घरात बोलावलं आणि तिला रूममध्ये नेत तिच्या डोक्यावर देखील हातोड्याने घाव घातले. यात प्रेयसीचा देखील मृत्यू झाला. 

 

हेही वाचा - हृदयद्रावक! घरासमोरची रात्र ठरली अखेरची...  

अफानने सहा जणांवर हातोड्याने घाव घातले. यात 5 जणांचा मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर अफानने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिली. तेव्हा तेथून सुटका नाही हे जाणवल्यावर त्याने उंदीर मारण्याचं औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.