क्राईम
अपहरण झालेल्या मुलीची सात महिन्यांनी सुटका; अकोल्यातील बार्शीटाकळी पोलिसांची कारवाई
अपहरण झालेल्या मुलीची सात महिन्यांनी सुटका करण्यात आली आहे. सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. अकोल्यातील बार्शीटाकळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अकोला जिल्ह्यात सायबर सेलच्या मदतीने मुलीचे अपहरण केलेल्या आरोपीचा शोध घेण्यात आला. नांदुरा येथे छापा टाकून पीडित मुलगी आणि 23 वर्षीय आरोपी विजय डाबेराव याला बार्शीटाकळी पोलिसांनी ताब्यात घेतले. सात महिन्यांपूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. एका युवकाने मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार 17 डिसेंबर 2024 रोजी पीडितेच्या वडिलांनी दिली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला आणि नांदुरा येथे छापा टाकून पीडित मुलगी आणि 23 वर्षीय आरोपी विजय डाबेराव याला बार्शीटाकळी पोलिसांनी ताब्यात घेतले.