पती - पत्नी यांच्यामध्ये होणाऱ्या भांडणाला तिथून क

पनवेलमधील खळबळ घटना! मुलीला 29 मजल्यावरून फेकून आईची आत्महत्या

दरवर्षी, आपल्याला पती - पत्नीमध्ये होणाऱ्या वाद-विवादांबद्दल सतत आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र, पती - पत्नी यांच्यामध्ये होणाऱ्या भांडणाला कंटाळून चक्क पत्नी आपल्याच बाळाला उंच इमारतीवरून खाली पाडते आणि त्याच्या थोड्याच वेळात स्वतः पत्नीदेखील तिथून उडी मारून आत्महत्या करते. अशीच एक घटना पनवेलमध्ये घडली असून अंगावर शहारे आणायला भाग पाडते.                         पनवेलमधील पळस्पे फाटा परिसरात असलेल्या नेक्सॉन मॅरेथॉनमधील औरा या भव्य टॉवरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकल्यानंतर आईनेदेखील तिथून उडी मारून आत्महत्या केली आहे. आशिष दुवा हे आपली पत्नी मैथिली दुवा (वय: 37 वर्ष) आणि मुलगी मायरा दुवा यांच्यासोबत राहत होते. मात्र! अचानक 8 वर्षांची मुलगी मायरा 29 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. याप्रसंगी, आशिष दुवा यांनी जेव्हा आपल्या मुलीला पाहण्यासाठी लागलीच खाली धाव घेतली, तेव्हा अचानक त्यांची पत्नी मैथिली दुवा देखील 29 व्या मजल्यावरून खाली पडल्या. क्षणातच त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची पत्नी आणि मुलगी मरण पावले. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. 

हेही वाचा: नाशिकमध्ये कृष्णा आंधळे फिरत असल्याचा दावा ठरला..; नाशिक पोलिसांचा खुलासा

                      या घटनेनंतर, आशिष दुवा यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी मैथिली यांची मानसिक परिस्थिती ठीक नव्हती. त्यासोबतच, अज्ञात कारणामुळे पत्नी मैथिली यांनी आपल्या 8 वर्षाच्या निष्पाप मायराला घरातील बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून देत तिचा जीव घेतला. इतकेच नाही तर स्वतः देखील 29 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. या घटनेनंतर, अनेक चर्चा या परिसरात ऐकायला मिळत आहेत. मात्र, या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाश्यांनी या घटनेबद्दल वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. शेजारी राहणाऱ्या रहिवाश्यांनुसार, आशिष दुवा आणि मैथिली दुवा या पती - पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती. त्याच रागातून पत्नी मैथिलीने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.                    या गूढ घटनेबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली असून, या घटनेबद्दल अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे करीत आहेत. मात्र, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.