ऑनलाइन परकीय चलनामध्ये  (फॉरेक्स ट्रेडिंग फ्रॉड) ए

Navi Mumbai Crime News : फॉरेक्स ट्रेडिंग घोटाळा! ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; AI चा आधार घेत तब्बल एक कोटी लुटले

मुंबई: ऑनलाइन परकीय चलनामध्ये  (फॉरेक्स ट्रेडिंग फ्रॉड) एका 76 वर्षीय व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली असून या चोरट्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार करणारा व्यक्ती हा वाशी येथील रहिवासी आहे. जूनमध्ये, इंटरनेटवर सर्फिंग करत असताना तक्रारदाराला एक जाहिरात दिसली. या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध भारतीय व्यावसायिकांनी एक एआय-आधारित सॉफ्टवेअर तयार केले आहे, ज्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे प्रचंड नफा मिळवता येतो असा सा दावा करण्यात आला होता. वरिष्ठ वित्त सल्लागार अशी ओळख सांगत एका व्यक्तीने तक्रारदाराला एक वेब लिंक पाठवली आणि त्या लिंकद्वारे ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यास सांगितले.

हेही वाचा: Hyderabad Crime News : जन्मदात्यानेच घेतला अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा जीव; बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल करत मृतदेह फेकला नदीत

त्यानंतर, 26 जूनपासून, तक्रारदाराने 60 हून अधिक व्यवहारांमध्ये वेगवेगळ्या लाभार्थी बँक खात्यांमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली. त्या व्यक्तीने तक्रारदाराला आकर्षक परताव्याचे आश्वासन देऊन पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले. कोणतेही पैसे दिले नाहीत हे लक्षात आल्यानंतर, तक्रारदाराने 11 सप्टेंबर रोजी सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली.

वाशीतील एका 76 वर्षीय रहिवाशाला ऑनलाइन जाहिरातीचे आमिष दाखवल्याने त्याने फॉरेक्स ट्रेडिंग घोटाळ्यात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे गमावले. वित्त सल्लागार म्हणून काम करत असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना खात्री पटवून दिली. त्यामुळे त्यांनी 60 पेक्षा अधिक व्यवहारांमध्ये ट्रान्सफर केले. फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी 11 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली.