न्यायालय हे असे ठिकाण आहे जिथे खटल्यांची सुनावणी क

कोर्टाच्या इमारतीत संशयास्पद प्रकार, खिळा ठोकलेला लिंबू आढळला; जादूटोण्याची शक्यता

कविता लोखंडे. प्रतिनिधी. नवी मुंबई: न्यायालय हे असे ठिकाण आहे जिथे खटल्यांची सुनावणी केली जाते आणि निकाल दिला जातो. मात्र, याच न्यायालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या इमारतीत चक्क खिळा ठोकलेला लिंबू दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा: फक्त दगडूशेठ गणपतीसाठी... ; इतर मंडळांनी पोलिस आयुक्तांना सुनावलं

नेमकं प्रकरण काय?

बेलापूर कोर्टात न्यायाधीशांवर दबाव आणून खटल्यावर प्रभाव पाडण्यासाठी काळ्या जादूचा प्रयोग केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका अज्ञाताने बेलापूर न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावर खिळा ठोकलेला लिंबू ठेवला होता. या दरम्यान, एका व्यक्तीने हा धक्कादायक प्रकार पाहिल्यावर, त्याने या घटनेचा व्हिडिओ केला. त्यामुळे, हा खळबळजनक प्रकार उघडकीस झाला. मात्र, या घटनेनंतर एका न्यायाधीश चार दिवसांच्या रजेवर गेल्याचीही चर्चा न्यायालयात आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. विशष बाब म्हणजे, बेलापूर न्यायालयात सीसीटीव्ही नाही. त्यामुळे या घटनेनंतर, बेलापूर न्यायालयाच्या इमारतीत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत आहे.