Nikki Bhati Murder Mystery: इंस्टा रील, ब्युटी पार्लर का 35 लाखांची मागणी; ग्रेटर नोएडातील निक्की हत्याकांडाचे नेमके कारण काय?
उत्तर प्रदेश: काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडातील निक्की भाटी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु आता निक्कीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सासरच्यांनी हुंड्याची मागणी केल्याने निक्कीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. परंतु घटनाक्रमानुसार हा वाद फक्त पैशांच्या आणि आलिशान गाडीच्या मागणीपुरताच मर्यादित नव्हता.
2016 रोजी 28 वर्षाच्या निक्की सिंहचा विवाह विपिन भाटीसोबत झाला. याच घरात तिची मोठी बहीण कंचन हिचे लग्न रोहित भाटीसोबत झाले. लग्नावेळी हुंड्यामध्ये दागिने, स्कॉर्पियो गाडी देण्यात आली होती. मात्र सासरच्यांचा लोभ वाढत गेला. विपिन, त्याचा मोठा भाऊ रोहित, सासू आणि सासरे सतत 35 लाख आणि एका कारची मागणी करत त्यांच्यावर दबाव आणत होते. निक्की आणि तिची बहीण कंचन ब्युटी पार्लर चालवत होत्या. यासोबतच त्या सोशल मीडियावर रील बनवत होत्या. इथूनच वादाला सुरुवात झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, विपिन आणि त्याच्या भावाला रील बनवण्यावर आक्षेप होता. या कारणामुळे 11 फेब्रवारीला घरात भांडण झाले आणि दोघी बहिणी माहेरी गेल्या. 18 मार्चला त्यांच्या घरात पंचायत झाली. भविष्यात दोघी रील बनवणार नाहीत असा निर्णय पंचायतीत झाला.
यानंतर निक्की आणि कंचन यांनी पार्लर सुरु करुन रील बनवायला सुरुवात केली. तसा वादाला पुन्हा तोंड फुटले. तथापि, रीलमुळे त्यांच्या मुलीचे हत्या झाल्याचे कारण निक्कीच्या वडिलांनी फेटाळले. ते म्हणाले, हुंड्यासाठी मुलीची हत्या झाली, हे खरे कारण आहे. या प्रकरणातील एफआयआरमध्ये लिहिले की, सासरच्यांनी निक्कीवर हुंड्यासाठी दबाव आणला. निक्कीने नकार दिल्याने तिला जिवंत जाळण्यात आले.
निक्की आणि तिची बहीण कंचन यांच्या सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटीमुळे भाटी परिवारात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होते. दोघी बहिणी इंस्टग्रामवर अॅक्टिव्ह होत्या आणि मेकरओवर संबंधी रील बनवून पोस्ट करत होत्या. हिच गोष्ट विपिन आणि रोहित यांना आवडत नव्हती असा धक्कादायक खुलासा भाटी परिवाराच्या शेजाऱ्यांनी केला आहे.
पार्लरवरुन निक्की आणि विपिनमध्ये भांडण 21 ऑगस्टला दुपारी निक्की आणि विपिनमध्ये पार्लर सुरु करण्यावरुन भांडण झाले. रागाच्या भरात विपिनने निक्कीला मारहाण केली. निक्कीच्या सहा वर्षाच्या मुलीने पप्पाने लाइटरने मम्मीला आग लावली असल्याचे म्हटले. मुलाचे हेच वाक्य पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. या प्रकरणात विपिन, रोहित, सासरे सतवीर आणि सासू दयावती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निक्कीच्या सासरच्यांना पोलिसांनी पकडले. मात्र विपिनने पोलिसांच्या ताब्यातून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्या पायवर गोळी मारली आणि तो जखमी झाला. रविवारी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
निक्की आणि विपिनमधील वादाचे हेच कारण होते का? या प्रकरणाचा आणखी एक पैलूही समोर आला आहे. असे सांगितले जात आहे की, 35 लाख रुपये हुंड्याशी संबंधित नव्हते तर कुटुंबातील वाद मिटवण्याशी संबंधित होते. निक्कीच्या भावाचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. त्याने आपल्या पत्नीला सोडले होते. या प्रकरणावर पंचायतीत तोडगा निघाला. सतवीर भाटीने यामध्ये मध्यस्थ म्हणून काम केले. यामुळे त्याला 35 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. यावरूनही वाद झाला.