पुण्यातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अधिकारी पतीन

अधिकारी पतीनेच केले क्लास वन अधिकारी पत्नीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट

पुणे: एकीकडे राज्यातील राजकारणात हनी ट्रॅप प्रकरण गाजत असताना दुसरीकडे, पुण्यातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अधिकारी पतीने चक्क आपल्या क्लास वन अधिकारी पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरातच स्पाय कॅमेरा बसवला. इतकच नाही, तर याच स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याने स्वत:च्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला. यानंतर, आरोपी पती स्वत:च्या पत्नीला ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला. या प्रकरणी, पीडित पत्नीने आपल्या क्लास वन अधिकारी पतीसोबतच, सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, अधिकारी पतीने त्याच्या पत्नीला कारच्या हप्त्यांसाठी माहेरून दीड लाख रुपये आणण्यास त्रास देत होता. याबाबत, क्लास वन अधिकाऱ्याच्या पत्नीने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच, या प्रकरणात सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश असल्याने तिने सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा: पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हसन मुश्रीफ देणार 'या' पदाचा राजीनामा

पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरात लावला स्पाय कॅमेरा

या दाम्पत्यांचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. काही काळ यांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र, काही वर्षानंतर आरोपी पतीला त्याच्या पत्नीवर संशय येऊ लागला. हळूहळू आरोपी पती त्याच्या पत्नीला त्रास देऊ लागला. पैशासाठी तो वारंवार तिला छळू लागला. तसेच, आपल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी आरोपी पतीने घरात स्पाय कॅमेरेदेखील बसवले होते. इतकच नाही तर, ऑफिसमध्ये गेल्यावर आरोपी पती त्याच्या क्लास वन ऑफिसर पत्नीवर नजर ठेऊ लागला. यानंतर, त्याने स्वतःच्या बाथरूममध्येही स्पाय कॅमेरे लावून ठेवले. स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपी पतीने आपल्या पत्नीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे उघड झाले. पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करत पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. स्पाय कॅमेरा व्हिडिओंबाबतही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.