राजगुरुनगरच्या चांडोलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शिरूर: राजगुरूजवळ असलेल्या चांडोली येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गेल्या चार महिन्यांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची ही चौथी घटना आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्या आचाऱ्यासोबत ती काम करत होती, त्याच नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार घडल्यानंतर, पीडित अल्पवयीन मुलगी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर अल्पवयीन मुलीची ओढणी आणि चप्पल सापडल्याने पीडित मुलीने आत्महत्या केल्याची शंका वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: 'विवाहितेला विष पाजून...'; सोलापुरात विवाहितेला काठी आणि रॉडने मारहाण
तसेच, पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या (NDRF) दोन पथकांकडून भिमानदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यावर तीन दिवसांपासून शोध मोहीम सुरु आहे. पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. तीन दिवस उलटूनही पीडित मुलगी सापडत नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढत आहे.
हेही वाचा: सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका विवाहितेची आत्महत्या