गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटन

आई नव्हे, वैरीण! प्रियकराच्या मदतीने मुलीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत असत आहे. अशातच पुण्यात प्रियकराच्या मदतीने आईने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत व्हायरल केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता महिलेने मुलीला स्वतःच्या प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवायला भाग पाडले. यानंतर आरोपी फरार झाले होते. पीडित मुलीने पोलिसांना या सगळ्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणार्‍या आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करून नातेवाईकांना व्हायरल केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी आई भारती कुऱ्हाडे आणि आरोपी प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोन आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यापूर्वी 13 वर्षीय पीडित मुलीस आरोपी आई भारती कुऱ्हाडे आणि आरोपी प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याबाबत समजले. त्यानंतर याबाबत पीडित मुलीने त्यांच्या घर मालकिणीला याची माहिती दिली. आमच्या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत घर मालकिणीला का सांगितले, असे म्हणून पीडित मुलीला आई आणि तिचा प्रियकर सातत्याने त्रास देऊ लागले. त्याच दरम्यान, गुरुदेव कुमार स्वामीने पीडित मुलीवर अत्याचार देखील केले. या सर्व घटनांचा आई भारती कुऱ्हाडे यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सर्व अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना शेअर केले.

हेही वाचा - पुण्यात रिक्षाचालकांची गुंडगिरी! नागरिकांना रोजचा फुकटचा त्रास; पोलीस अद्याप गप्पच

त्या घटनेनंतर पीडित मुलीने याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 13 वर्षीय मुलीला तिच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. ही माहिती मुलीने त्यांच्या घर मालकिणीला दिली. हे समजल्यावर पीडित मुलीच्या आईने तिला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. यातच महिलेच्या प्रियकराने मुलीवर अत्याचार केले. याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. याबाबत दोन्ही आरोपींना माहिती होताच ते फरार झाले.

पीडित मुलीची आई आणि तिचा प्रियकर या दोन्ही आरोपींचा शोध सुरू असताना, आरोपी आई भारती कुऱ्हाडे आणि प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी हे खडकवासला नांदेड गाव येथील एका चाळीत राहत असल्याची माहीती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.

हेही वाचा - Sambhaji Nagar: दत्तक घेतलेल्या 4 वर्षीय चिमुकलीची हत्या