पाळणाघरातील विद्यार्थिनींना काढलं बाहेर; बुलढाण्यातील द्वारकाबाई चवरे पाळणा घरातील घटना
बुलढाणा: पाळणाघरातील विद्यार्थिनींना बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भाडेकरु विद्यार्थिनींना अतिरिक्त पैशांची मागणी करत त्यांना बाहेर काढलं आहे. शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून केला जात आहे. बुलढाण्यातील द्वारकाबाई चवरे पाळणा घरातील ही घटना आहे.
बुलढाणा शहरातील द्वारकाबाई चवरे पाळणा घरात भाड्याने राहत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींना येथील नवीन आलेल्या अधीक्षकेने कारण नसताना रूम बाहेर काढले आहे. शिवीगाळ करत या अधीक्षकेकडून विद्यार्थिनीला मारहाण देखील करण्यात आली आहे. द्वारकाबाई चवरे पाळणा घरात गेल्या अनेक महिन्यांपासून या विद्यार्थिनी शिक्षणासाठी या ठिकाणी राहत आहेत. मात्र नवीन आलेल्या पाळणाघर अधीक्षकाकडून कारण नसताना या विद्यार्थिनीवर ओरडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींनी या अधीक्षकांबाबत पोलिसात देखील माहिती दिली आहे. या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा : लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव; लोणीकरांच्या वक्तव्यावर विरोधक आक्रमक
बुलढाणा शरहात द्वारकाबाई चवरे पाळणा घरात विद्यार्थिनी भाड्याने राहत होत्या. मात्र नवीन आलेल्या महिला अधिक्षकांकडून मुलींना रुममधून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्याचबरोबर शिवीगाळ करत महिला अधिक्षकेने विद्यार्थिनीना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थिंनींना केला आहे. द्वारकाबाई पाळणा घरात बऱ्याच दिवसांपासून या विद्यार्थिंनी राहत होत्या. मात्र महिला अधिक्षकेने विद्यार्थिंनीवर आरडाओरडा केला. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला. तसेच अधिक्षकांनी केलेला गैरप्रकार विद्यार्थिनींनी पोलिसांना सांगितला आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.