उरणमध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना शिक्षकाची अमानुष मारहाण!
मुंबई : उरणच्या बोरखार भागातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांनी संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अशोक कुटे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने इयत्ता तिसरी आणि चौथीतील विद्यार्थिनींना केवळ परिपाठ पूर्ण न केल्याच्या रागातून बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थिनींच्या अंगावर आणि गालावर लाल चट्टे उठले. या घटनेमुळे विद्यार्थिनींना मानसिक धक्का बसला आणि त्या हमसाहमशी रडू लागल्या.
👉👉 हे देखील वाचा : महायुतीत दोस्तीत कुस्ती; गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचा दबदबा!
घटनेची माहिती मिळताच संतप्त पालक शाळेत दाखल झाले व त्यांनी शिक्षकाला धारेवर धरले. पालकांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिक्षक अशोक कुटे याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.