वसईत 12 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचाराचा प्रकार उघ

Human Trafficking : संतापजनक! अल्पवयीन मुलीवर तब्बल 200 जणांनी केले अत्याचार; पीडितेने सांगितला चीड आणणारा प्रवास

Human Trafficking : वसई परिसरात मानवी तस्करी व अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने एनजीओंच्या मदतीने केलेल्या कारवाईत एका 12 वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.

नायगाव येथे रेस्क्यू ऑपरेशन

26 जुलै रोजी नायगाव परिसरात झालेल्या संयुक्त कारवाईत एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत मिळून ही अल्पवयीन पीडिता वाचवली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी मूळची परराज्यातील असून ती एका विषयात नापास झाल्यानंतर घरच्यांच्या रागाच्या भीतीने घर सोडून गेली होती.

भुलवून तस्करीकडे प्रवास

घरातून पळून गेलेल्या मुलीला एका ओळखीच्या महिलेनं फसवून प्रथम कलकत्त्यात नेलं. तिथे तिची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर तिला गुजरातमधील नाडियाड येथे पोहोचवण्यात आलं. तेथे एका वयोवृद्ध व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले, तिचे अश्लील फोटो काढले आणि ब्लॅकमेल करून देहव्यापारात ढकलले. हेही वाचा: Beed Crime: तृतीयपंथीच्या जाळ्यात फसली परप्रांतीय तरुणी, निर्जन भागात नेऊन... मुंबईपर्यंतची भयानक कहाणी

नाडियाडनंतर तिला मुंबई परिसरात आणण्यात आलं. विविध ठिकाणी तिच्यावर शारीरिक अत्याचार होत राहिले. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर शेकडो वेळा अत्याचार झाले. वयाच्या केवळ 12 व्या वर्षी या मुलीने भोगलेला हा अमानुष अनुभव ऐकून पोलिस व सामाजिक कार्यकर्ते दोघेही हादरले आहेत.

नऊ आरोपी ताब्यात

या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिला आणि सात पुरुष दलालांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. इतर आरोपी व या रॅकेटशी संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे. हेही वाचा: Beed Crime: बीडच्या गेवराईत महिलेवर गोळीबार, दवाखान्यात उपचार सुरु तरीही पोलीस अनभिज्ञच

पीडितेचे समुपदेशन सुरू

सुटकेनंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिथे तिच्यावर मानसोपचार आणि समुपदेशन सुरू असून तिला पुन्हा सामान्य जीवनाकडे आणण्याचा प्रयत्न होत आहे.

एनजीओंची कठोर कारवाईची मागणी

एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी सांगितले की, 'अल्पवयीन मुलींच्या अशा तस्करी व अत्याचारप्रकरणी दोषींवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. समाजानेही अशा प्रवृत्तीविरोधात जागरूक राहणे गरजेचे आहे.'

हा प्रकार पुन्हा एकदा अधोरेखित करतो की, निराधार व असुरक्षित मुलांचे संरक्षण ही केवळ पोलिस किंवा एनजीओंची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. मानवी तस्करीचे जाळे मोडण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे.