वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार; पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात स्पष्ट उल्लेख
बीड : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून राज्यात वातावरण तापलं आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सगळीकडे आहे. अशातच आता पोलिसांनी 80 दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोप पत्रातून वाल्मिक कराड हाच देशमुख हत्येचा सूत्रधार असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. दोषारोप पत्रातून खंडणीच्या वादानंतर हत्येचा कट रचल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपपत्रात विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेचंही नाव आहे. तसेच सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे यांच्या नावांचा उल्लेख आहे.
हेही वाचा : सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक; नाशिक पोलिसांकडून एकाला अटक
आरोपत्रातील आरोपींची क्रमवारी आरोपी क्रमांक एक- वाल्मीक कराड आरोपी क्रमांक दोन- विष्णू चाटे आरोपी क्रमांक तीन- सुदर्शन घुले आरोपी क्रमांक चार- प्रतीक घुले आरोपी क्रमांक पाच- सुधीर सांगळे आरोपी क्रमांक सहा- महेश केदार आरोपी क्रमांक सात- जयराम चाटे आरोपी क्रमांक 8 फरार- कृष्णा आंधळे नववा आरोपी- सिद्धार्थ सोनवणे
दोषारोप पत्रात काय? संतोष देशमुखांची हत्या अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून झाली. वाल्मिक कराडला सुदर्शन घुलेनं कॉल केला होता. देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदार आहेत. यामधून वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध झालं आहे. नांदूर फाटा इथं तिरंगा हॉटेलवर भेट झाली. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा निरोप विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला दिला. मारहाण करताना व्हिडिओ कॉल सुरू होता. जयराम चाटेने एका ग्रुपवर कॉल केला होता. आरोप पत्रामध्ये पहिला आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव आलं आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या तिन्ही प्रकरण एकत्रित केले. ही तिन्ही प्रकरणे एकाच कारणातून घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात आहेत.