Shocking! असा विश्वासघात कोणाच्या नशिबी न येवो! आधी पतीला किडनी विकायला लावली अन् पैसे घेऊन झाली प्रियकरासोबत फरार
Crime News : पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने तिच्या पतीला अत्यंत भयंकर प्रकाराने फसवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आपल्या आर्थिक तंगीतून बाहेर येण्यासाठी तसेच,आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी या महिलेने पतीला त्याची स्वतःची चक्क किडनी विकायला तयार केलं. मात्र, तिच्या डोक्यात काहीतरी भयंकर कारस्थान शिजत होतं याचा त्या बिचाऱ्याला पत्ताही नव्हता..
पत्नीने आर्थिक समस्यांमधून बाहेर येण्यासाठी स्वत:च्याच पतीला फूस लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यास तयार केलं आणि याच्या माध्यमातून पतीची किडनी १० लाखांना विकली. विशेष बाब म्हणजे किडनी विकून पैसे मिळताच ही महिला रातोरात पतीला सोडून फरार झाली. पश्चिम बंगालच्या हावडा येथे ही घटना घडली आहे.
हेही वाचा - स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपीला अटक; 'गळ्यावर दोरीचे वळ, आत्महत्येचा प्रयत्न?' पोलिसांची माहिती
घर-संसारासाठी आणि पत्नी आणि मुलीच्या प्रेमापोटी पती स्वतःची किडनी विकायला तयार झाला.तसेच, ही शस्त्रक्रिया त्याच्या आरोग्याच्या कारणास्तव गरजेची असल्याचे तिने पतीला पटवून दिले होते. अखेर यशस्वीरित्या 10 लाखांना त्याची किडनी विकल्यानंतर हे पैसे बँकेत जमा करणार असल्याचे सांगून ती पैसे घरी घेऊन आली. पतीनेही पत्नीवर विश्वास ठेवून तिच्याजवळ पैसे दिले. पण तिने त्यालाच फसवण्याची एक अत्यंत क्रूर योजना आखली.
पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील संकरेल भागात ही घटना घडली असून आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या महिलेने तिच्या पतीला कित्येक महिने फूस लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार केलं. पण शस्त्रक्रिया होऊन पैसे हातात येताच ती रातोरात प्रियकरासोबत फरार झाली.
नेमकं काय झालं? शस्त्रक्रिया होऊन पैसे मिळाल्यानंतर अचानक रात्रीतून पत्नी गायब झाल्याने पतीला चांगलाच धक्का बसला. जेव्हा त्याने पत्नीचा शोध घेतला तेव्हा ती एका पेंटरबरोबर बॅरकपूर परिसरात राहत असल्याचे त्याला आढळून आले आहे.
आपल्याबरोबर विश्वासघात झाल्याचे लक्षात अल्यानंतर त्या व्यक्तीने कुटुंबीयांना बरोबर घेऊन तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने उलट त्यालाच घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून देण्याची धमकी दिली. अखेप पत्नीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणालाही अद्याप अटक झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.