गुरुवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी न्या

कराडच्या संपत्तीवर टाच येणार?

बीड : वाल्मिक कराडच्या विरोधातला फास अधिकाधिक आवळला जाताना दिसत आहे. कराडच्या संपत्तीचा मामला न्यायालयात गुरुवारी चर्चेत आला. या माध्यमातून गुन्हेगारीच्या मार्गाने कमावलेला पैसा कुठे वळला याची चर्चा न्यायालयात होणे अपेक्षित आहे. कराडच्या पाठीराख्याला या खुलाशाने काळजी वाटेल कारण ही सगळी माहिती आर्थिक गुन्हेगारीच्या एका अशा प्रकरणाचा खुलासा करणार आहे ज्यातून अनेकांचे कारनामे उघड होतील. 

गुरुवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. यावेळी, सरकारी पक्षाने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली. सरकारी पक्षाने आरोपीच्या वकिलांना पुराव्यांचा तपशील सादर केला. पुराव्यांचा अभ्यास करायला आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितली. पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करावी असे कराडचे म्हणणे आहे. सरकारी वकिलांनी देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर केला. कराडची संपत्ती मकोका अंतर्गत जप्त करा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. या प्रकरणाशी आपला संबंध नाही वाल्मिक कराडने म्हटले आहे. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही असा अर्ज कराडने न्यायालयात दाखल केला. तसेच निर्दोष मुक्तता करण्याची मागणी कोर्टात वाल्मिक कराडने केली आहे.  मला बीड न्यायालयात शिफ्ट करा अशी मागणी विष्णू चाटेने यावेळी केली. 

हेही वाचा : अखेर तहव्वूर राणाला आणलाच; राणाला दिल्लीत एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज

वाल्मिक कराडची संपत्ती?

भाजपा आमदार सुरेश धस यांनी वेळोवेळी वाल्मिक कराडच्या संपत्तीवर भाष्य केले आहे. चिंचवड, काळेवाडी येथे पत्नी मंजली आणि वाल्मिकच्या नावे 4 बीएचके फ्लॅट आहे याची अंदाजे किंमत सव्वा तीन कोटी रुपये इतकी आहे. पुणे, वाकड - टू बीएचके फ्लॅट, अंदाजे किंमत 1 कोटी रुपयांचा आहे. पुणे, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफीस आहेत. याची अंदाजे किंमत बारा कोटी रुपये आहे. हडपसर भागात एमनोरा टाऊनशीपमध्ये  दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन फ्लॅट आहेत. त्याची अंदाजे किंमत तीन कोटी रुपये आहे. बीड, सिमरी पारगावात सुदाम नरोडे याच्या नावावर 50 एकर जमीन आहे. बार्शी, शेंद्री गावात दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्ये मनिष नरोडे याच्या नावावर सुमारे 12 एकर जमीन आहे. सिमरी पारगावात योगेश काकडे यांच्या नावावर सुमारे 20 एकर जमीन आहे असा दावा आमदार धस यांनी केला आहे. बीडच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर हे सगळं प्रकरण विष्णू चाटेच्या कबुलीमुळे उलगडू लागलं आहे. तपास यंत्रणेने खंडणीचा तपास कठोरपणे केला आणि चाटेच्या कबुलीचा माग काढायचे ठरवले तर, जे होईल ते बीडचे राजकारण ढवळून काढणारे असेल. 

खंडणी प्रकरण कुठवर जाणार? तपास यंत्रणा चाटेच्या कबुली आधारे खंडणीचा माग काढतील. वाल्मिक खंडणी कुणासाठी मागत होता, हा तपास असेल. खंडणीचा पैसा कुठे आणि कुणासाठी वापरला जायचा हे तपासले जाईल. खंडणीचा पैसा ही बेहिशेबी मालमत्ता मानली जाईल. खंडणीच्या पैशातून संपत्ती खरेदी झाली हे सिद्ध केले जाईल. खंडणीच्या पैशातून खरेदी झालेली संपत्ती जप्त होईल. पैशाची अफरातफर करणे, बेहिशेबी मालमत्ता जमवणे याचे गुन्हे दाखल होतील. वाल्मिकचे साथीदार आणि सूत्रधार सापडल्यावर प्रकरण आणखीन गंभीर बनेल. खंडणी वसुलीचे प्रकरण संघटित गुन्हेगारी स्वरूपात मोजले जाईल. संघटित टोळीच्या गुन्हेगाराला किमान 3 वर्ष किंवा जन्मठेप होऊ शकते. वाल्मिकला खंडणी वसुलीसाठी ज्यांनी सांगितले ते ही तुरुंगात जातील. 

विशेष म्हणजे वाल्मिक कराड याला दोन बायका आहेत. बेनामी संपत्ती निर्माण करण्यासाठी या दोघींच्या नावाचा खुबीने वापर केला जात आहे. ज्योती जाधव ही वाल्मिकीची दुसरी बायको आहे. तिच्या नावे दोन फ्लॅट पुण्यात फर्ग्युसन रोडवरच्या व्यावसायिक इमारतीत दोन गाळे असल्याचे समोर आलं आहे. याची अधिकृत कागदपत्रे 'जय महाराष्ट्र'च्या हाती आहेत.  बीड प्रकरणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे. कायद्यानुसार कुणीही सुटणार नाही अशी टीका वाल्मिक कराडवर जरांगेंनी केली आहे.