बंगळुरूमधील हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण ब

Bengaluru Murder: पत्नीची हत्या करून पतीने मृतदेह ठेवला सुटकेसमध्ये

बंगळुरूमधील हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण बेंगळुरूतील एका भाड्याच्या घरात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळले. 36 वर्षीय राकेशने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाला सुटकेसमध्ये ठेवले. या घटनेनंतर, राकेश बंगळुरूमधील राहते घर सोडून पळून गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेशला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एका वृत्तानुसार, राकेश सांबेकरने गौरीच्या पालकांशी संपर्क साधला आणि फोनवरून गुन्ह्याची कबुली दिली होती. महाराष्ट्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

 

घटनेनंतर, फॉरेन्सिक आणि गुन्हे पथके तैनात:

स्थानिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी सारा फातिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सायंकाळी 5:30 वाजता, आम्हाला नियंत्रण कक्षात संशयास्पद प्रकरणाबद्दल फोन आला होता. जेव्हा पोलीस घरात पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. मात्र, आत प्रवेश केल्यानंतर पोलिसांना बाथरूममध्ये एक सुटकेस मिळाली. त्यानंतर, फॉरेन्सिक टीमने सुटकेस उघडली आणि मृतदेह सापडला'. 

'महिलेचा ,मृतदेह शाबूत आहे आणि मृतदेहाचे तुकडे झालेले नाहीत. मात्र त्यावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत', असे अधिकाऱ्याने सांगितले. 

 

आरोपीचा शोध सुरु:

सुरुवातीला, पोलिसांनी मृत महिलेच्या पतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा त्यांना काहीच कळले नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी राकेशला पुण्यात ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांनी राकेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे', असे स्थानिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी सारा फातिमा यांनी माहिती दिली. 

पुण्यातून आरोपी राकेश अटक:

पत्नीला जीवे मारून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवल्यानंतर, आरोपी राकेश पुण्याला पळून गेला होता. मात्र, बंगळुरूमधील हुलीमावू आणि पुणे पोलिस यांनी एकमेकांना सहकार्य केल्यानंतर आरोपी राकेशचे कॉल रेकॉर्ड ट्रॅक केले. त्यामुळे आरोपीला लवकर अटक करण्यात आली. पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपी राकेशला बंगळुरूमध्ये आणण्यासाठी पोलिसांचे एक पथक पुण्याला रवाना झाले आहे. 

गुन्हा करण्यामागील नेमकं सत्य काय?

'नेमकं कोणत्या कारणामुळे राकेशने एवढी टोकाची भूमिका घेतली? हे जाणून घेण्यासाठी या घटनेवर अधिक तपास करत आहोत', असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

स्थानिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी सारा फातिमा यांनी माहिती दिली, 'या जोडप्याचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. दोघे महाराष्ट्राचे आहेत आणि नोकरीसाठी दोन महिन्यांपूर्वी बेंगळुरूला आले होते. राकेश एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आणि गौरी गृहिणी होती आणि नोकरीच्या शोधात होती.