लातूरच्या वसतिगृहात तरुणाला बेल्टने मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
लातूर : लातूर जिल्ह्यातील एका वसतीगृहात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लातूर शहरातील ट्युशन एरिया परिसरात असलेल्या एका खाजगी वस्तीगृहात तरुणाला बेल्टने मारहाण केल्याची घटना घडली असून सदरील घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी व्हिडिओतील पीडित तरुणाचा शोध घेऊन मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले आहे.
लातूरमध्ये राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र याच ठिकाणी एका वसतीगृहात तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. वस्तीगृहामध्ये बेल्टने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर व्हिडिओतील पीडित मुलाचा शोध घेतला जात आहे. तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले आहे.