Suicide Case: नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे तरुणाची आत्महत्या
पिंपरी चिंचवड : पिंपरी शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मित्रानेच नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पिंपरी शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 5 ते 6 मित्रांनी त्यांच्याच सोबत शिकणाऱ्या एका मित्राला ग्रींडर गे ऍपवर बनावट अकाउंटवरून संपर्क साधला. त्याला रूमवर बोलावलं आणि अन्य एका व्यक्तीचे अश्लील अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्या मित्राला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि 50 हजार रुपये नाही दिले तर संबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने पीडित विद्यार्थी घाबरला आणि त्याने पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरील पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
हेही वाचा : नागपूरातील हिंसाचार प्रकरणावरुन मंत्री नितेश राणे आक्रमक
घटनेत मरण पावलेल्या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाकडे 50 हजार देण्याची मागणी केली होती. ते पैसे तो कुणाला देणार होता याचा शोध घेत असताना हा गुन्हा उघडकीस आला. पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयात एकत्र शिकणाऱ्या मित्रांनी त्यांच्याच एका मित्राचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने एका 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 3 आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 5 ते 6 मित्रांनी त्यांच्याचसोबत शिकणाऱ्या एका मित्राला ग्रींडर गे ऍप वर बनावट अकाउंटवरून संपर्क साधला आणि त्याला रूमवर बोलवून त्याचे आणि अन्य एका व्यक्तीचे अश्लील अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्या मित्राला ब्लॅकमेल करायला सुरवात केली आणि 50 हजार रुपये नाही दिले तर संबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकाराने पीडित विद्यार्थी घाबरला आणि त्याने पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन वरील पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.