म्हणून आई माझी बेस्ट फ्रेंड ! अभिनेता स्वप्नील जोशी ने आईच्या वाढदिवशी लिहिली खास पोस्ट
२०२४ वर्ष गाजवत असलेला सुपरस्टार निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी ! स्वप्नील कायम वैविध्यपूर्ण गोष्टी साठी चर्चेत असतो आणि आज याचं कारण देखील तितकच खास आहे. स्वप्नील ने आईच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया वर एक छान व्हिडिओ शेयर करून आईला शुभेच्छा तर दिल्या आहेत पण स्वप्नील ने त्याचं आणि आईचं खास नातं यातून उलगडल आहे.
अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आईविषयी बोलताना दिसतोय स्वप्नील म्हणतो, “आम्ही मम्माज बॉय आहे. आई ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला एखादी मुलगी आवडली तर मी तिला हक्काने जाऊन सांगायचो. आई बसना आज काय झालं माहितीये…आई एकदम बंटा है होती. अजूनही ती बंटा है आहे.
आई हे असं एकमेव नातं आहे जे फोनवरच्या हॅलोने पण सांगतं काय रे, काय झालं? पुढे स्वप्नील ने या व्हिडिओ ला तितकच साजेस छान कॅप्शन लिहिलं " आई ७४व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुझ्या शहाणपणाने, काळजीने आणि प्रेमाने या प्रवासाला आकार दिला. माझं आयुष्य म्हणण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला या जगात आणल्याबद्दल आणि आमचे सर्व जीवन आनंदमय केल्याबद्दल धन्यवाद. तुझा दिवस उत्तम आरोग्य, अमर्याद आनंदाने आणि तू उदारपणे इतरांसोबत वाटून घेतलेले प्रेम आणि कुटुंबासाठी एक सुंदर घर बनवलेलं जावो, हे असे अनेक सुंदर क्षण एकत्र आहेत. तुझ्या अतुलनीय प्रवासासाठी शुभेच्छा खूप सारं प्रेम
स्वप्नील सध्या कामात व्यस्त असला तरी तो कायम त्याचा फॅमिली सोबत बघायला मिळतो. स्वप्नीलच्या त्याचा आईचा खास व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होतोय आणि या व्हिडिओ मधून या दोघांचं खास नात देखील प्रेक्षकांना बघायला मिळतंय !