अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी, 'हगवणे कुटुंबाच्या व

'राजकारण बाजूला ठेवा, न्याय द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणावर दीपाली सय्यद म्हणाल्या

पुणे: राजेंद्र हगवणेंची सून, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. नुकताच, बुधवारी हगवणे कुटुंबीयांना कोर्टात हजर केले होते. तेव्हा आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टासमोर करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी हगवणेंच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी, 'हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीचं बाहेर अफेअर आहे, असं सांगणं चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणी पुणे पोलिसांचं हगवणे बंधूंना रेड कार्पेट ट्रीटमेंट?

अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या:

अभिनेत्री दीपाली सय्यदने तिची भीती व्यक्त केली आहे की, 'वैष्णवीच्या बाळाकडे पाहून आणि तिचा प्रश्न उपस्थित करूनही मला गोंधळ होतो. राजकारण बाजूला ठेवा, वैष्णवी हगवणेला न्याय मिळणे महत्वाचे आहे. जर वैष्णवीला न्याय मिळाला नाही तर भविष्यात अनेक वैष्णवी निर्माण होतील'. पुढे दीपाली म्हणाल्या की, 'मी माझ्या येणाऱ्या चित्रपटात महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्या खुर्चीवर बसून कशाप्रकारे न्याय दिला पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं. पुरुष असो किंवा स्त्री, चुकीला माफी नाही', दीपाली सय्यद स्पष्टपणे म्हणाल्या. 'सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात माझ्या नावाच्या पाटीला ब्लर करायला लावलं. सिनेमात महिला आयोगाचा अध्यक्ष होणे म्हणून चुकीचे आहे का?', असा सवाल दीपाली सय्यद यांनी विचारला.