गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर एका वेगळ्याच क

मृणालला धनुषच्या बहिणींचीही साथ? अखेर अफेअरच्या चर्चेमध्ये झाला मोठा खुलासा

मुंबई: 'सीता रामम', 'हाय नन्ना', आदी. दक्षिणात्य चित्रपटात काम करून आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सतत चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मनोरंजन क्षेत्रात मृणाल ठाकूर सुपरस्टार धनुषला डेट करत आहे अशी चर्चा सुरू आहे. 

नेटीझन्सने बऱ्याचदा मृणाल आणि धनुषला एकत्र पाहिले आहे. मग ते 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाशी संबंधित कार्यक्रम असो किंवा मृणालच्या वाढदिवसाच्या पार्टीशी संबंधित कार्यक्रम, धनुष तिच्यासोबत सर्वत्र दिसला. तेव्हापासून दोघांच्या डेटिंच्या अफवा पसरत आहेत. या दरम्यान, आणखी एक कारण समोर आले आहे, ज्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या अफवांना बळकटी मिळाली आहे. हे कारण धनुषच्या बहिणींशी संबंधित आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

इंस्टाग्रामवर केले बहिणींना फॉलो

नुकताच, 'सन ऑफ सरदार 2' फेम अभिनेत्री मृणालने धनुषच्या दोन्ही बहिणींना इंस्टाग्रामवर फॉलो केले आहे. तसेच, धनुषच्या दोन मोठ्या बहिणी डॉ. कार्तिका कार्तिक आणि विमला गीता यांच्या यादीत मृणालचे नाव येत आहे. त्यामुळे, मृणाल आणि धनुषच्या डेटिंगच्या अफवांना बळकटी मिळाली आहे. 

दोघांच्या अफवा समोर आल्यापासून, मृणाल आणि धनुषचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे जाहीर नाही केले. धनुष त्याच्या दोन्ही बहिणींच्या खूप जवळचा आहे आणि तो महिन्यातून 2-3 वेळा त्यांना भेटायला जातो. धनुषच्या बहिणी कार्तिका कार्तिक आणि विमला गीता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या अनेकदा धनुषसोबतचे फोटो शेअर करतात.