अमिताभ बच्चन फिल्म साइन करताना जया-अभिषेक नव्हे, त

Amitabh Bachchan: ना जया, ना अभिषेक... चित्रपट निवडताना अमिताभ बच्चन घेतात 'या' व्यक्तीचा सल्ला

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे 'महानायक' अमिताभ बच्चन हे फक्त अभिनेते नाहीत, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रेरणास्त्रोत आहे. 82 वर्षांचे आयुष्य आणि 56 वर्षांचे करिअर असूनही, बिग बी आजही चित्रपटांमध्ये त्याच जोमाने कार्यरत आहेत. त्यांच्या लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोड़पति’ नेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षांमध्ये असंख्य चित्रपट साइन केले आहेत, पण आपण कधी विचार केला आहे का की त्यांनी एखादी फिल्म साइन करण्यापूर्वी कोणाची मते घेतात? बहुतांश लोकांचा अनुमान असेल की ते आपल्या पत्नी जया बच्चन किंवा सून ऐश्वर्या रायचा सल्ला घेत असतील. पण सत्य हे थोडे वेगळे आहे. अमिताभ आपल्या सिनेमांचे निर्णय घेताना मुलगी श्वेता बच्चन-नंदा हिची मते घेतात.

श्वेता बच्चन नंदा बॉलिवूडमध्ये काम करत नाही, ती एक लेखिका आणि कॉलमनिस्ट आहे. तिचे फिल्मी करिअर नाही, पण चित्रपटांचे कथानक, पटकथा आणि संपूर्ण सिनेमाई शैलीवर त्यांचे निरीक्षण आणि समज खूप गहन आहे. 2018 मध्ये श्वेताच्या पुस्तकाच्या लाँच इव्हेंटमध्ये अमिताभ यांनी एक मोठा खुलासा करत सांगितले होते की, 'मी माझ्या प्रत्येक फिल्मबाबत श्वेताची मते नक्की विचारतो.' हेही वाचा: Govinda and Sunita Ahuja : व्यभिचार, क्रूरता, फसवणूक; गोविंदावर गंभीर आरोप करत सुनीतानं केला घटस्फोटासाठी अर्ज दाखल

अमिताभने खुलासा केला की श्वेताची निरीक्षण क्षमता (Observation Power) फारच उत्तम आहे. जरी ती अभिनेत्री नसली तरीही, तिला चित्रपटांची चांगली समज आहे आणि ती कोणती फिल्म हिट होईल हे अगदी अचूक ओळखू शकते. त्यांनी असेही सांगितले की, श्वेताने ज्या फिल्म्सबाबत सूचना दिल्या त्या बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. यामुळे बिग बीला चित्रपट साइन करताना श्वेताचा मार्गदर्शन मिळतो.

हा  खुलासा केल्यानंतर अनेक चाहते आणि मीडिया यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत असलेल्या एका दिग्गज कलाकाराने आपल्या फिल्म निवडीसाठी मुलीचे मत घेतो, हे ऐकणे निश्चितच प्रेरणादायक आहे. हे दर्शवते की, अमिताभ फक्त मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे अभिनेते नाहीत, तर त्यांना  कौटुंबिक नाती आणि मुलीच्या विचारांचे महत्त्व माहीत आहे. श्वेताची मते विचारात घेणे फक्त पारंपरिक निर्णय नाही, तर अमिताभसाठी महत्वाचे मार्गदर्शन ठरते. अमिताभ म्हणाले की, 'श्वेताने दिलेली सूचना मला चित्रपट साइन करताना मदत करते. तिचे निरीक्षण नेहमीच अचूक ठरते.' हा खुलास केल्यानंतर चाहते श्वेताचेही कौतुक करत आहेत. 

बिग बी यांचा हा निर्णय त्यांच्या करिअरमधील एक अनोखा पैलू आहे. चित्रपटसृष्टीत 56 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक कलाकार आणि कुटुंबीयांचा प्रभाव असतो, पण मुलीची मते विचारात घेणे हा एक खास आणि प्रेमळ दृष्टिकोन आहे. यामुळे अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन यांचे नाते फक्त कौटुंबिक नाही तर व्यावसायिक सल्लागार नातेही ठरते. अशा प्रकारे अमिताभ बच्चनची चित्रपट निवड ही फक्त अनुभवावर किंवा इतरांचे मतावर आधारित नसून, श्वेताच्या सूचनांवरही अवलंबून असते. हे उघड करत आहे की, प्रेक्षकांसाठी त्यांनी निवडलेल्या अनेक हिट चित्रपटामागे श्वेताची सूक्ष्म निरीक्षण क्षमता आणि विचारांचा मोठा हात आहे.