Ganeshotsav 2025 : यंदा शिल्पा शेट्टीच्या घरी गणेशोत्सव नाही होणार साजरी; कारण सांगताना म्हणाली, 'आम्हाला सांगण्यास...'
मुंबई: आज सर्वसामान्य जनतेपासून ते अगदी सेलिब्रिटींच्या घरा-घरात गणरायाचे आगमन झाले. मात्र, यंदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी गणेशोत्सव साजरा नाही करणार. आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे नेमकं कोणत्या कारणामुळे, आज शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले नाही? चला सविस्तर जाणून घेऊया.
'या' कारणामुळे शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले नाही
काही दिवसांपूर्वी, शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत याची अधिकृत माहिती दिली. शिल्पा शेट्टी म्हणाली की, 'आम्हाला सांगण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, कुटुंबातील शोकांमुळे यंदा आम्ही गणपती उत्सवाचे आगमन नाही करू शकणार'.
पुढे, शिल्पा शेट्टी म्हणाली की, 'परंपरेनुसार, आम्ही 13 दिवस सुतक पाळणार आहोत. त्यामुळे, आम्हाला कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. आम्हाला तुमच्या समजुतीची आणि प्रार्थनाची अपेक्षा आहे'. शेवटी, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे लिहिले.