विकी कौशलच्या 'छावा'ने 8 व्या दिवशीही खूप कमाई केल

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने 8व्या दिवशी ओलांडला 242 कोटींचा गल्ला; पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक!

Chhaava Box Office Collection Day 8

Chhaava Box Office Collection Day 8: सध्या बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमाई करणाऱ्या या चित्रपटाने 7 दिवसांत 219 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 8 दिवस झाले आहेत, परंतु, चित्रपटाच्या कमाईचा आलेख सतत वाढत आहे. छावा चित्रपटाने रिलीजच्या 8 व्या दिवशी किती कमाई केली आणि त्याचे एकूण कलेक्शन किती झाले? ते जाणून घेऊयात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले छावा चित्रपटाचे कौतुक -  

विकी कौशलच्या 'छावा'ने 8 व्या दिवशीही खूप कमाई केली. हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने 8 व्या दिवशी 23.5 कोटी रुपये कमावले. 8 दिवसांनंतर भारतात त्याची एकूण कमाई आता 242 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. 9 व्या दिवशी हा चित्रपट 250 कोटींचा आकडा ओलांडेल असा अंदाज आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विकी कौशलच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 

हेही वाचा - 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात

दरम्यान, छावाची जगभरातील एकूण कमाई आतापर्यंत सुमारे 340 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. छावाचे बजेट 130 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे छावा चित्रपटाने आतापर्यंत जवळजवळ खर्चाच्या दुप्पट पैसे मिळवले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स बॅनरखाली बनवण्यात आला आहे. 

हेही वाचा - छावा’साठी विकी कौशलचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन! फिटनेसचे रहस्य काय?

छावा चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट विकी कौशलच्या कारकिर्दीतील एक सुपरहिट चित्रपट असल्याचे सिद्ध होत आहे. पुढील काही दिवसांत हा चित्रपट कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडू शकतो.