Dashavatar Box Office: 'दशावतार'चा बोलबाला! नवव्या दिवशी केली तुफान कमाई, मोडले सर्व रेकॉर्ड
Dashavatar Box Office: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका सिनेमाची सर्वाधिक चर्चा होत आहे आणि तो म्हणजे दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेतला ‘दशावतार’. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. दुसऱ्या शनिवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर असा विक्रम केला की तो चर्चेचा विषय ठरला आहे.
पहिल्या आठवड्यात तब्बल 9.2 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अजिबात कमी झालेली नाही. उलट दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षक थिएटरकडे आणखी मोठ्या संख्येने धावत असल्याचे दिसून आले. नवव्या दिवशी या चित्रपटाने 2.65 कोटींहून अधिक कमाई करत स्वत:चाच रेकॉर्ड मोडला. हेही वाचा: Dadasaheb Phalke Award 2023: अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार; भारतीय सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण
दुसऱ्या शुक्रवारी जवळपास 1 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर शनिवारी अचानक जोरदार उसळी दिसून आली. या दिवशी झालेली कमाई आतापर्यंतची सर्वाधिक ठरली. यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन तब्बल 12.85 कोटींवर पोहोचले आहे.
सिनेमाच्या लोकप्रियतेचा अंदाज थिएटरमधील गर्दीवरूनही येतो. 20 सप्टेंबर रोजी ‘दशावतार’साठी जवळपास 61.5 टक्के सीट्स भरल्या गेल्या. सकाळच्या शोला 39 टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळाला, दुपारपर्यंत तो 59 टक्क्यांवर पोहोचला, संध्याकाळी 67 टक्क्यांपेक्षा जास्त आणि रात्री तब्बल 79 टक्क्यांपर्यंत थिएटर हाऊसफुल्ल झाले. हेही वाचा: Katrina Kaif Pregnancy: प्रेग्नन्सीच्या अफवांनंतर कतरीना कैफचा बेबी बंप फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?
प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता स्पष्ट होतं की, ‘दशावतार’ केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवत आहे. दमदार कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय या सगळ्यामुळे हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करताना दिसतोय.
सध्या हॉलिवूड व बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा करत ‘दशावतार’ने स्वतःचं प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. मराठी सिनेमाला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच उद्योगासाठी सकारात्मक संकेत मानला जातो. आता पुढच्या काही दिवसांत हा सिनेमा कोणते नवे विक्रम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.