Dashavtar Box Office Hit Marathi Movie : 'दशावतार'च्या निर्मात्यांनी घेतला अनपेक्षित निर्णय; प्रेक्षक नाराज, म्हणाले 'काय गरज होती?'
Dashavtar Box Office Hit Marathi Movie : 'दशावतार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच, त्याच्या निर्मात्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे आणि 'याची काय गरज होती?' असा प्रश्न ते विचारत आहेत.
सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. केवळ चार दिवसांतच या चित्रपटाने प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवला आहे. माऊथ पब्लिसिटीमुळे त्याचे शोजही वाढले आहेत. सुरुवातीच्या तीन दिवसांतच या चित्रपटाने 5 कोटी 22 लाख रुपयांची कमाई केली आहे. या यशानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शो वाढवले. सुरुवातीला 325 स्क्रीन्सवर 600 शो होते, जे शनिवारपर्यंत 800 आणि रविवारी 975 झाले. सगळीकडे हाऊसफुल्लचे बोर्ड लागत होते. पण, चित्रपटाची कमाई तगडी होत असताना, निर्मात्यांनी तिकिटाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - Betting App Case: बेटिंग अॅप प्रकरणात सोनू सूदला ED चे समन्स, 'या' दिवशी दिल्ली मुख्यालयात हजर राहणार
झी स्टुडिओज मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार, 'दशावतार'च्या निर्मात्यांनी एक ऑफर जाहीर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. ही ऑफर 16 सप्टेंबरसाठी (आज) आहे आणि ती ठराविक शहरांमध्येच लागू आहे.
प्रेक्षकांकडून आणि चित्रपट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त निर्मात्यांच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कमेंटमध्ये म्हटले आहे की, "तिकिटाचे दर आहे तेवढेच ठेवा, कमी का करताय? चित्रपट छान आहे," "ऑफर दिली ही चांगली गोष्ट आहे, पण दर कमी करण्याची काही गरज नव्हती. खूप दिवसांनी तगडा मराठी चित्रपट आला आहे," असे अनेकांनी म्हटले आहे. चित्रपटाला चांगली कमाई होत असताना आणि प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत असताना तिकिटाचे दर कमी करण्याची काय गरज आहे, असा सवालही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
हेही वाचा - Katrina Kaif Pregnant: कतरिना कैफ-विकी कौशल आई-बाबा होणार? माध्यमांमध्ये चर्चांना उधाण