दीपिकाला ‘कल्की 2898 एडी’मधून का काढण्यात आले यावर

Deepika Padukone: दीपिका पादुकोणने शेअर केला 'या' अभिनेत्यासोबतचा खास फोटो; कल्की 2898 एडी विवादावर दिलं प्रत्युत्तर

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक तसेच व्यावसायिक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतीच तिने एका मुलीला जन्म दिल्यानंतर थोडा काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहून आता पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. मात्र, याच काळात तिच्या चाहत्यांना धक्का बसला. कारण प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ या बिग-बजेट चित्रपटातून तिला बाहेर काढल्याची बातमी समोर आली.

हेही वाचा - Zubeen Garg Postmortem: सिंगापूरमध्ये जुबीन गर्ग यांचे शवविच्छेदन पूर्ण; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली मोठी अपडेट

या निर्णयामुळे नाराज झालेल्या दीपिकाने काही दिवस मौन बाळगले होते. अखेर तिने सोशल मीडियावर शाहरुख खानसोबतचा फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे निर्मात्यांना उत्तर दिले. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'जवळपास 18 वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’च्या वेळी शाहरुखने मला पहिला धडा दिला होता. चित्रपटाचे यश महत्त्वाचे असतेच, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो अनुभव आणि सोबत काम करणारे लोक.' दीपिकाने पुढे लिहिले की, 'हीच शिकवण मी आजवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयात लागू केली आहे. कदाचित यामुळेच आपण पुन्हा एकत्र आलो आहोत.'

हेही वाचा - Farah Khan : दिलीपच्या पगाराबाबत फराहने केला गमतीदार खुलासा; म्हणाली, 'दिलीपचा पगार दरमहा...'

दीपिकाने या पोस्टमध्ये 'किंग अँड डे 1' असे कॅप्शन देत शाहरुखला टॅग केले. सध्या दोघे मिळून ‘किंग’ या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. हा शाहरुख आणि दीपिकाचा सहावा प्रकल्प ठरणार असून, या जोडीने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक हिट्स दिल्या आहेत.

दरम्यान, दीपिकाला ‘कल्की 2898 एडी’मधून का काढण्यात आले यावर वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. अभिनेत्रीने फी जास्त मागितली आणि कामाचे तास कमी ठेवण्याची अट घातली, असे म्हटलं जात आहे. मात्र, दीपिकाच्या नव्या पोस्टनंतर चाहत्यांनी तिला भरभरून पाठिंबा दर्शवला आहे.