Ganeshotsav 2025 : घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम! गणेशोत्सवासाठी गोविंदा अन् सुनीता एकत्र
मुंबई: मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती. अशातच, गोविंदाच्या मॅनेजरने अशी माहिती दिली होती की, 'गणेश चतुर्थीसाठी दोघे एकत्र येतील'. दरम्यान, गणेश चर्तुथीच्या निमित्ताने अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा एकत्र आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यासोबतच, त्यांनी टीना आणि यशसाठी आशीर्वादही मागितले.
गोविंदा काय म्हणाला?
'याहून खास काय असेल? जेव्हा बाप्पाचा आशीर्वाद लाभतो, तेव्हा कुटुंबातील सर्व अडचणी दूर आणि दु:ख नष्ट होतात. आम्ही प्रार्थना करतो, की आपण सर्वजण एकत्र शांततेत जीवन व्यतीत करावं. तसेच, आपण सारे असेच एकत्र राहू', अशी प्रतिक्रिया गोविदांने दिली.
पुढे, गोविंदा म्हणाला की, 'माझा मुलगा यश आणि मुलगी टीनासाठी तुमचा आशीर्वाद मागतो. तुम्ही सर्वजण त्यांना साथ आणि आधार द्या. त्यांच्या यशासाठी मी बाप्पाकडे प्रार्थना करतो'.
घटस्फोटाच्या अफवांवर दोघांनी साधला मौन
जेव्हा माध्यमांनी गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनिता अहुजा यांना घटस्फोटाच्या अफवांबाबत प्रश्न विचारले, तेव्हा गोविदाने मौन साधला. मात्र, सुनिता अहुजा म्हणाली की, 'तुम्ही इथे गणपती बाप्पा मोरया म्हणायला आला आहात की अफवा ऐकायला आला आहात?'.