Elvish Yadav Firing : कपिल शर्माच्या कॅफेनंतर आता एल्विश यादवच्या घरावर अंदाधुंद गोळीबार; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे
दिल्ली: बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या गुरूग्राम सेक्टर 56 मधील घरावर रविवारी सकाळी दोन हल्लेखोरांनी गोळीबार करण्यात आला आहे. या हल्लेखोरांनी एल्विशच्या घरावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे 5 ते 6 च्या सुमारास घडली होती. यादरम्यान, एल्विश घरात नव्हता. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरात फक्त केअरटेकर होता. यानंतर, संबंधित केअरटेकरने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
पोलिसांचा शोध सुरू
गुरूग्राम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. यासह, घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आले आहे. तसेच, पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी सुरुवात केली आहे. यासह, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
हेही वाचा: Flight Colour: विमानं प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचीच का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण
काही दिवसांपूर्वी, कॅनडातील कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'वर काही अज्ञातांनी हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी कॅप्स कॅफेवर 9 वेळा गोळीबार केला. एनडीटीव्हीच्या वृतानुसार, या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लाडीने स्वीकारली आहे. हरजीत सिंग मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.