ओटीटी ते थिएटरपर्यंत 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजनाच्या क्षेत्रात, शुक्रवार अत्यंत महत्वाचा समजला जातो. शुक्रवारी, अनेक नवनवीन चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. मागील शुक्रवारच्या तुलनेने हा शुक्रवार खूप खास असणार आहे, कारण या दिवशी होळीचा सण असणार आहे. चला तर जाणून घेऊया कोण-कोणते नवीन चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
द डिप्लोमॅट (The Diplomat):
वेदा या चित्रपटात दमदार भूमिका साकारून लवकरच अभिनेता जॉन अब्राहम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'द डिप्लोमॅट (The Diplomat)' असे चित्रपटाचे नाव असून अभिनेता जॉन आपल्याला देशभक्तीचे उदाहरण मांडताना दिसणार आहे. शुक्रवारी, 14 मार्च 2025 रोजी द डिप्लोमॅट (The Diplomat) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बी हैप्पी (Be Happy):
लवकरच अभिनेता अभिषेक बच्चन ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 'बी हॅप्पी (Be Happy)' चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट शुक्रवारी, 14 मार्च 2025 रोजी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime Video) वर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे. या चित्रपटात सिंगल वडिलाची हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळणार आहे.
एजेंट (Agent):
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनीचा एक एक्शन - थ्रिलर चित्रपट 'एजेंट (Agent)' ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म सोनी लिवमध्ये (Sony Liv) रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. दोन वर्षांपूर्वी चित्रपटात रिलीज झालेला हा चित्रपट शुक्रवारी, 14 मार्च 2025 रोजी सोनी लिववर (Sony Liv) स्ट्रीम केला जाईल.
ऑड्रे (Audrey):
प्रसिद्ध ऑड्रे हेपबर्नच्या (Audrey Hepburn) जीवनावर आधारित माहितीपट शुक्रवारी,14 मार्च 2025 रोजी नेटलफिक्स (Netflix) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या माहितीपटात त्याचे लव्ह लाईफ आणि उपलब्धी तपशीलवार दाखवण्यात येणार आहेत.
वनवास (Vanvaas):
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा 'वनवास (Vanvaas)' फॅमिली ड्रामा असलेला चित्रपट मागच्या वर्षी म्हणजेच डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. शुक्रवारी, 14 मार्च 2025 रोजी हा चित्रपट झी5 (Zee5) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल.