सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी तिचा रस्ते अपघातात

Kajal Aggarwal Accident: 'मी पूर्णपणे सुरक्षित आहे...'; अपघातात मृत्यू झाल्याच्या अफवांवर काजलने प्रतिक्रिया

Kajal Aggarwal Death Rumours: प्रसिद्ध बॉलीवूड आणि दक्षिणेतील अभिनेत्री काजल अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर मृत्यूच्या अफवेमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी तिचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वेगाने पसरली. गंभीर दुखापतींमुळे ती जग सोडून गेल्याचा दावा करण्यात आला. या धक्कादायक अफवेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. अल्पावधीतच काजलने स्वतः पुढे येऊन या सर्व अफवा फेटाळून लावल्या. तिने तिच्या चाहत्यांना आश्वस्त करत सांगितले की, ती पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहे.

हेही वाचा - Navya Nair : चमेलीच्या फुलांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत, मेलबर्न एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

काजलची सोशल मीडिया पोस्ट

सोमवारी काजल अग्रवालने इंस्टाग्राम स्टोरी आणि X वर पोस्ट शेअर केली. त्यात अभिनेत्रीने सांगितलं आहे की, 'मला काही निराधार बातम्या मिळाल्या आहेत ज्यात दावा केला जात आहे की माझा अपघात झाला आहे (आणि मी आता या जगात नाही!). खरे सांगायचे तर, त्यात अजिबात तथ्य नाही. देवाच्या कृपेने मी पूर्णपणे ठीक आहे आणि सुरक्षित आहे. कृपया अशा खोट्या व निराधार बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आपण आपली ऊर्जा सकारात्मकता आणि सत्यावर केंद्रित करूया.' 

हेही वाचा - The Bengal Files : ट्रेलर प्रदर्शनापासूनच वादात राहिलेल्या The Bengal Files नं तीन दिवसांत जमवला कोट्यवधीचा गल्ला; चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू

या अफवांदरम्यान काजल तिच्या कौटुंबिक आयुष्यात व्यस्त आहे. अलीकडेच ती पती गौतम किचलूसोबत मालदीवच्या सुट्टीवर गेली होती. काजल अग्रवाल अलीकडेच विष्णू मंचूच्या 'कन्नप्पा' चित्रपटात दिसली. तसेच सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत 'सिकंदर' मध्येही ती झळकली आहे. पुढील काळात ती कमल हासनच्या बहुप्रतिक्षित 'इंडियन 3' मध्ये झळकणार आहे. याशिवाय, नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या महाकाव्य चित्रपटात ती रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.