करिश्मा कपूरच्या दोन मुलांनी त्यांच्या दिवंगत वडील

Sanjay Kapur Property Dispute: करिश्मा कपूरच्या मुलांची 30 हजार कोटींच्या मालमत्तेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

Sunjay Kapur Property Dispute: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन मुलांनी त्यांच्या दिवंगत वडील संजय कपूर यांच्या मालमत्तेत आपला वाटा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका 10 सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. याचिकेत संजय कपूर यांच्या मृत्युपत्राच्या वैधतेला आव्हान दिले गेले आहे. मुलांचा आरोप आहे की, संजय कपूर किंवा त्यांच्या सावत्र आई प्रिया कपूर यांनी त्यांना मृत्युपत्राच्या अस्तित्वाबाबत कधीही माहिती दिली नाही. तसेच, प्रिया कपूर यांच्या वर्तनावरून निःसंशयपणे असे सूचित होते की, ते मृत्युपत्र बनावट असावे. तथापी, दिल्ली उच्च न्यायालय या प्रकरणाची सविस्तरपणे सुनावणी करेल आणि मालमत्तेविषयक वादावर पुढील पावले उचलेल. 

दरम्यान, करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांचे दिवंगत वडील संजय कपूर यांच्या 30 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केली. 21 मार्च 2025 रोजी संजय कपूर यांच्या मृत्युपत्राला संशयास्पद आणि बनावट ठरवत समायरा-कियान यांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Aly Goni Controversy: 'मी मुस्लीम आहे म्हणून...'; अली गोनीने सांगितलं ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलण्यामागचे कारण

प्रिया सचदेव यांच्याविरुद्ध गंभीर आरोप

या याचिकेत, करिश्माच्या मुलांनी असा दावा केला आहे की त्यांचे वडील संजय कपूर यांनी मृत्युपत्राचा उल्लेख केला नाही किंवा त्यांची सावत्र आई प्रिया कपूर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने या मृत्युपत्राच्या अस्तित्वाचा उल्लेख केला नाही. प्रियाच्या वर्तनावरून असे दिसून येते की हे कथित मृत्युपत्र तिने कोणत्याही शंकाशिवाय बनावट बनवले आहे. तक्रारीत तिचे दोन सहकारी दिनेश अग्रवाल आणि नितीन शर्मा यांचाही उल्लेख आहे. 

हेही वाचा - Kajal Aggarwal Accident: 'मी पूर्णपणे सुरक्षित आहे...'; अपघातात मृत्यू झाल्याच्या अफवांवर काजलने प्रतिक्रिया

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची मुले समायरा आणि कियान यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, 12 जून 2025 रोजी त्यांच्या वडिलांचे अचानक निधन होईपर्यंत, त्यांचे आणि त्यांच्या वडिलांचे खूप चांगले संबंध होते. ते अनेकदा एकत्र प्रवास करायचे आणि एकत्र सुट्टी घालवायची. इतकेच नाही तर त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक कामातही त्यांचा नियमित सहभाग असायचा.