Katrina Kaif Pregnant: कतरिना कैफ-विकी कौशल आई-बाबा होणार? माध्यमांमध्ये चर्चांना उधाण
Katrina Kaif Pregnant: कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठी बातमी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ गर्भवती असल्याची बातमी अनेक माध्यमांनी दिली आहे. त्यामुळे लवकरचं आता कतरिना आई तर विकी कौशल बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अद्याप जोडप्याने यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.
कतरिना काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि चित्रपटातून दूर आहे. ती सोशल मीडियावरही कमी सक्रिय आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कतरिना आणि विकी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ शकतात. प्रसूतीनंतर कतरिना दीर्घकालीन सुट्टीवर जाऊ शकते, अशाही बामत्या सध्या माध्यमांमध्ये येत आहेत.
कतरिनाच्या गर्भधारणेच्या अफवा यापूर्वीही पसरल्या होत्या. विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' चित्रपटाच्या काळातही कतरिनाच्या गर्भवती होण्यासंदर्भातील बातम्याला उधाणं आलं होतं. परंतु, तेव्हा विकी कौशल म्हणाला होता की चांगली बातमी येईल तेव्हा ते ती नक्कीच चाहत्यांसोबत शेअर करतील.
दरम्यान, कतरिना शेवटची 'मेरी क्रिसमस' या क्राईम-थ्रिलर चित्रपटात दिसली होती, ज्यात विजय सेतुपती, राधिका आपटे, संजय कपूर आणि अदिती गोवित्रीकर प्रमुख भूमिकेत होते. तथापी, आता या आनंदाच्या बातमीमुळे चाहते कतरिना आणि विकीचे अभिनंदन करत आहेत.