'खालिद का शिवाजी' या चित्रपटावर बंदीची मागणी, इतिह
Khalid Ka Shivaji Controversy: चित्रपट 'खालिद का शिवाजी' वादाच्या भोवऱ्यात; नेमकं कारण काय? जाणून घ्या
Khalid Ka Shivaji Controversy: 'खालिद का शिवाजी' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातील काही दावे, संदर्भ यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची जोरदार मागणी हिंदू महासंघाने केली आहे. त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसेच निर्मात्याला पत्र पाठवले आहे. त्यामुळे हा चित्रपट खरोखरच प्रदर्शित होणार की त्यावर बंदी घातली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून तो कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडला आहे.हा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास असल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे. निर्मात्याने शिवाजी महाराजांचे विकृतीकरण केले आहे, त्यांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आनंद दवे यांनी केला आहे. हा चित्रपटावर बंदी घातली नाही तर चित्रपट ज्या ठिकाणी प्रदर्शित होईल तिथे आंदोलन करू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पुण्यात अनेक चित्रपट ग्रहणी हा चित्रपट दाखवणार नसल्याचे सांगितलं आहे अस देखील आनंद दवे यांनी सांगितल आहे.