Kiara Advani Pregnant: कियारा- सिद्धार्थच्या आयुष्यात येणार गोड गिफ्ट
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. अभिनेत्री कियाराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्या वर्गाला ही गोड बातमी दिलीय. गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर त्यांनी ही गोड बातमी दिलीय . या फोटोमध्ये दोघांनीही हातात छोटे मोजे धरले आहे . आणि त्याचबरोबर पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुंदर असे वाक्य लिहले आहे. “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट... लवकरच येत आहे.” असे कॅप्शन लिहीत कियारा आणि सिद्धार्थने ही गोड बातमी चाहत्या वर्गाला दिलीय. दरम्यान सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय.
हेही वाचा: Pune Shivshahi Bus Case : दत्ता गाडेला फाशी होणार? कियारा आणि सिद्धार्थच्या या पोस्ट नंतर इतर बॉलिवूड अभिनेता अभिनेत्रींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांच्या या पोस्टनंतर ईशान खट्टरने, शर्वरीने, नेहा धुपिया, हुमा कुरेशी, रिया कपूर आणि विक्रम फडणीस यांनीही कियारा आणि सिद्धार्थला शुभेच्छा दिल्यात.
दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिल्याने चाहता वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून येतंय. हातात छोटे मोजे असलेला फोटो पोस्ट करत “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट... लवकरच येत आहे.” असे सुंदर वाक्य कॅप्शनमध्ये लिहून या जोडप्याने ही गोड बातमी दिलीय.