BookMyShow ने कलाकारांच्या यादीतून आणि तिकीट प्लॅट

Kunal Kamra Controvercy: कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या; BookMyShow ने नावासह हटवला विनोदी कलाकाराचा कंटेंट

Kunal Kamra

BookMyShow Removes All Content of Kunal Kamra: स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. अलीकडेच शिवसेनेच्या शिंदे गटाने कुणाल कामरा यांच्या विरोधात निषेध नोंदवला होता. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. BookMyShow ने कलाकारांच्या यादीतून आणि तिकीट प्लॅटफॉर्ममधून स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव काढून टाकले आहे. तथापी,  बुकमायशोच्या कुणाल कामरा यांच्यावरील कारवाईचे शिंदे गट शिवसेनेने स्वागत केले असून शिवसेना नेत्यांनी ऑनलाइन तिकीट विक्री प्लॅटफॉर्मच्या सीईओचेही आभार मानले आहेत.

हेही वाचा - Kunal Kamra Gets Anticipatory Bail: कुणाल कामराला अटकेपासून मोठा दिलासा! मद्रास उच्च न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन

राहुल कनाल यांनी BookMyShow ला केली होती मागणी - 

शिवसेनेने BookMyShow ला एक पत्र लिहिले होते ज्यामध्ये कुणाल कामराचे नाव कलाकारांच्या यादीतून आणि तिकीट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. या कारवाईनंतर शिवसेनेचे सोशल मीडिया प्रभारी राहुल कनाल यांनी बुकमायशोचे सीईओ आशिष हेमराजानी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, 'तुमच्या टीमकडून आम्हाला सतत मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. कुणाल कामरा यांना विक्री आणि जाहिरातींच्या यादीतून आणि BookMyShow च्या शोध इतिहासातून वगळल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देशात शांतता राखण्यात आणि आमच्या भावनांचा आदर करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईतील लोकांना प्रत्येक कला आवडते आणि त्यावर त्यांचा अपार विश्वास आहे पण त्यांना कोणत्याही वैयक्तिक अजेंडाचाही तिटकारा आहे.'

हेही वाचा - Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! विधानपरिषदेने स्विकारली विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस

अलिकडेच स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. कुणाल कामराच्या व्हायरल व्हिडिओवरून शिवसेना समर्थकांनी बराच गोंधळ घातला आणि त्याच्यावर कठोर कारवाईची मागणीही केली. तथापि, मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने होऊनही, कुणाल कामराने माफी मागण्यास नकार दिला.