Gautami Patil New Song : गौतमी पाटीलचं 'राणी एक नंबर' गाणं प्रदर्शित, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
गौतमी पाटील हिचं 'पिवोट म्युझिक प्रस्तुत' “राणी एक नंबर” हे भन्नाट गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे गाणं बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफ़िक्सचा वापर करून बनवलेलं आहे. तसेच गायिका सोनाली सोनवणेने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. रोहन साखरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर कैलाश पवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिलं आहे. संगीत नियोजन मोहन उपासनी आणि संकेत गुरव यांनी केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी गोपी बैरागी आणि निलेश भोर यांनी केले आहे. तसेच या गाण्याची प्रोजेक्ट हेड विनया सावंत आहे. तर गाण्याच्या पब्लिसिटी फॉरेवर पीआर ही कंपनी करत आहे.
गौतमी पाटील “राणी एक नंबर” गाण्याचा अनुभव सांगितला आहे, “या गाण्याच्या नावातच “राणी एक नंबर” आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं एक नंबरच असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला या गाण्याच्या शूटला खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही नक्कीच या गाण्यावर थिरकणार आहात. तसेच मी पिवोट म्यूजिकचे आणि संगीतकार मोहन उपासनी यांचे आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही माझ्या इतर गाण्याला भरभरून प्रेम दिल तसच प्रेम “राणी एक नंबर” या गाण्याला द्या. राणी एक नंबर या गाण्यावर तुमचे सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा. तुम्हाला हे गाणं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”
गायिका सोनाली सोनवणे 'राणी एक नंबर' गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगते, राणी एक नंबर हे गाणं कम्प्लीटली फीमेल सेंट्रिक गाणं आहे. एक मुलगी जेव्हा सेल्फ ऑब्सेसड आणि कॉन्फिडेंट आहे तर ती काय बोलेल याचा अभ्यास मी केला. आणि तशाच हरकती मी या गाण्यात घेतल्या आहेत. गाण्याची संपूर्ण टीम म्यूजिक स्टूडियोमध्ये उपस्थित होती. सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिल. हे गाणं डान्सिकल आहे. त्यामुळे मी ते संपूर्ण एनर्जीने गाणं गायल आहे. मला गाणं गाताना खूप मज्जा आली. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय ते पाहून फार आनंद होत आहे.”
संगीतकार मोहन उपासनी गाण्याविषयी सांगतात,” एक नंबर हा शब्द माझ्या डोक्यात घोळत होता. त्या शब्दाला घेवून हे गाण करायचं मी ठरवल. आणि मी जेव्हा कंपोझिशन करायला बसलो. तेव्हा हे कॉम्बिनेशन जुळून येत होत. अशी ही सर्व गाण्याची सुरुवातीची प्रोसेस होती. या गाण्याला अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. पिवोट म्यूजिक सर्व प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम गाणी घेवून आणण्याचा प्रयत्न करेल. राणी एक नंबर हे गाणं सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.”